बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) जेल लॉक-अपमध्ये, (Lock Upp) स्पर्धकांना त्यांच्या जागी राहण्यासाठी त्यांची सीक्रेट्स शेअर करावी लागतात. बाकीच्यांप्रमाणे पायल रोहतगीनेही (Payal Rohatgi) तिचे सीक्रेट्स शेअर केले. तिने खुलासा केला की तिचे करिअर घडवण्यासाठी ती वशिकरण पूजा करत असे. लॉक अपच्या ताज्या एपिसोडमध्ये पायलने सांगितले की, तिने तिच्या आईलाही याबद्दल सांगितले नाही. कारण तिने असे केले तर रिजल्ट तिच्या बाजूने लागणार नाही.(Big reveal of actress in lockup)
लॉक अपमध्ये पायलने कंगनासमोर तिचे गुपित उघड केले. हे ऐकल्यानंतर कंगनाने पायलला चिडवले आणि म्हटले की, तिचा नवरा आणि रिसेलर संग्राम सिंह देखील विचार करत असतील की या पूजेमुळे त्यालाही तिच्यावर प्रेम तर झाले नाही ना? मात्र, पायलने यावर नकार दिला. यानंतर कंगनाने सांगितले की, जेव्हा तिने फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा तिच्यावर काळी जादू केल्याचा आरोपही झाला होता.
पायल म्हणाली, मला या इंडस्ट्रीत 15 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि एक काळ असा होता जेव्हा माझ्या कारकिर्दीत काहीही चांगले घडत नव्हते. मग मी तांत्रिक पूजा केली. जेणेकरून माझ्या करिअरला भरारी मिळेल. पायलने सांगितले की, तिला कोणीतरी हे करायला सांगितले होते. माझं करिअर बरबाद होत होतं, म्हणून कुणीतरी मला ही पूजा करायला सांगितली. मी ही काळी जादू केली.
ती पुढे म्हणते की, कोणतीही सुशिक्षित महिला असा विचार करत नाही की, करीयर वाचवण्यासाठी पूजा केली पाहिजे, पण मी ही पूजा एका पंडिताकडून दिल्लीत करून घेतली. ही वशिकरण पूजा होती. माझे करिअर वाचवण्यासाठी मी वशिकरण केले. त्याचा फायदा झाला नाही ही वेगळी बाब. हे त्या निर्मात्यासाठी होते ज्याच्यासोबत मला काम करायचे होते. याबद्दल मी कोणालाच सांगितले नाही, अगदी माझ्या आईलाही नाही.
यावर संग्रामची प्रतिक्रिया मांडत कंगनाने तिची खिल्ली उडवली. म्हणाली, काय केलेस? काळी जादू? तू लोकांना इन्फ्लुएंस करण्याचा प्रयत्न करत होतीस. कंगना पुढे म्हणते की, पायल मला वाटतं तू खूप सुंदर आणि प्रतिभावान आहेस. लोकांना प्रभावित करण्यासाठी तांत्रिकाची गरज नाही. तुम्ही अशाच एखाद्यावर प्रभाव टाकू शकता.
कंगना पुढे म्हणाली, मला वाटतं इथे खूप पक्षपात होत आहे. मी जेव्हा इंडस्ट्रीत आले तेव्हा मला असेही सांगण्यात आले होते की मी काळी जादू करते. जेव्हा एखादी मुलगी यशस्वी होते, तेव्हा लोक तिच्या यशावर शंका घेऊ लागतात. ते विचार करू लागतात की हिच्यात काही जादूई शक्ती आहे. ही प्रगत कशी होईल? यशस्वी कशी झाली? पण त्याचा सामना करण्यासाठी, पुन्हा एकदा लढण्यासाठी तुम्हाला खूप ताकद हवी आहे.
2016 मध्ये कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अद्यान सुमनने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, कंगना माझ्यावर काळी जादू करायची. एक दिवस कंगनाने मला तिच्या घरी बोलावले आणि सांगितले की मला रात्री पूजा करायची आहे. रात्री साडेअकरा वाजता पोहोचलो आणि 12 वाजता पूजेला सुरुवात झाली. तिच्या इथे एक छोटीशी गेस्ट रूम होती. ज्याला तिने काळ्या रंगाने झाकले होते. पडदेही काळे होते.
महत्वाच्या बातम्या-
स्टाईलिश लूक, जबरदस्त ऍब्स, शाहरुख खानने शेअर केला ‘पठाण’चा पहिला लूक; कॅप्शनने लोकांना लावले वेड
नाद केला भावा तू! परदेशातील नोकरीला लाथ मारून मायदेशी फुलवली शेती, आज लाखोंची उलाढाल
बॉलिवूडच्या फेमस जोडीत आला दुरावा; लग्नाची बोलणी सुरू असतानाच श्रद्धा कपूरचा झाला ब्रेकअप
ठाकरे सरकारला दणका! परमबीर सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय