Share

रणवीरसिंगच्या न्युड फोटोनंतर बडा राजकीय नेता संतापला; उपस्थीत केला ‘हा’ सवाल

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने न्यूड फोटोशूट केले आहेत. हे फोटो त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोशुटमुळे सध्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. राजकीय वर्तुळात देखील यावरून चर्चा होऊ लागल्या आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अबू आझमी यांनी सोशल मीडियावर रणवीर सिंगचे न्यूड फोटो टाकत ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिले आहे की, रणवीर सिंगवर माझा आक्षेप नाही पण कोणीही निर्वस्त्र दिसलं नाही पाहिजे असा कायदा देशात आहे. जो निर्वस्त्र दिसेल त्याच्यावर केस होते पण आज देशात उघड्या शरीराचं प्रदर्शन चालू आहे, हे कसं चालतं?

इस्लाममध्ये महिलांनी संपूर्ण शरीर झाकणारे हिजाब घालणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे. या देशाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्यामुळेच मी पाकिस्तानात गेलो नाही आणि आज इथे मुस्लिमांवर बंधणे घातले जातात. असे अबू आझमी यांनी लिहिले.

तसेच लिहिले, शरीराचं प्रदर्शन करणाऱ्याला स्वातंत्र्य आहे आणि संपूर्ण शरीर झाकणाऱ्या हिजाबला विरोध का केला जातो? असा सवाल देखील केला आहे. आज ते सोलापूर दौऱ्यावर होते, पत्रकारांशी बोलताना त्यांनी याविषयावर संवाद साधला.

म्हणाले, आपल्या देशात नग्न फोटो शेअर केलेले चालतात. एक महिला दुसऱ्या पुरुषासोबत लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहिलेली चालते, दोन पुरुष एकमेकांसोबत पाहिलेले चालतात. मग हिजाबलाच काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी केला.

हिजाब घातलेल्या महिला चोरी करतील का, अशी भीती वाटत असेल तिथे महिला कर्मचारी लावा. देशात हिरोनेही नग्न फोटो काढलेले चालतात. या हिरोला माझा विरोध नाही, पण हिजाबला बंदी का असा माझा सवाल आहे असे अबू आझमी म्हणाले. त्यांनी या संदर्भातील ट्विटवर रणवीर सिंगला देखील टॅग केलं आहे.

राजकारण बाॅलीवुड राज्य

Join WhatsApp

Join Now