क्रीडा जगतासाठी हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. मुंबईचे माजी खेळाडू आणि महान क्रिकेटपटू विनू मांकड यांचा मुलगा राहुल मांकड यांचे लंडनमध्ये निधन झाले. ते अतिशय अप्रतिम फलंदाज होते. त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीचे सर्वांनाच वेड लागले होते. ते 66 वर्षांचे होते.
भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल मांकड यांचे लंडनमध्ये आकस्मिक निधन झाले. राहुल मांकडच्या मृत्यूच्या वृत्ताबद्दल मुंबईचे माजी खेळाडू शिशिर हटांगडी यांनी केलेल्या फेसबुक पोस्टद्वारे समजले, ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘जिग्गा भाई, माझा मित्र राहुल मांकडच्या आत्म्याला देव शांती देवो.’
राहुल मांकड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. राहुल मांकड यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. राहुल मांकड यांच्या करिअर बद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी 47 प्रथम श्रेणी सामने खेळले ज्यात त्याने 2,111 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 162 धावा होती.
त्यांनी आपल्या फलंदाजाने 5 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत. त्यांचे कुटुंब देखील क्रिकेटशी जोडले गेले आहे. त्यांचे भाऊ अशोक आणि अतुल मांकड हे देखील क्रिकेटपटू होते. अशोक यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले तर अतुल हे देशांतर्गत क्रिकेट खेळले.
राहुल मांकड हे 1972-73 ते 1984-85 पर्यंत क्रिकेट खेळले. राहुल मांकड यांनी अनेक सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजी केली. प्रथम श्रेणीतही त्याच्या नावावर सात विकेट आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू टीए सेकर यांनी त्यांच्या निधनाचे दुःख व्यक्त करत ट्विट केले आहे.
ट्विट मध्ये लिहिले की, राहुल मांकड यांच्या निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. खऱ्या अर्थाने तो एक सज्जन, चांगला क्रिकेटपटू आणि एक महान माणूस होता. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. राहुल मांकडचे वडील विनू मांकड हे देखील एक क्रिकेटर होते.
आयपीएल 2018 मध्ये रविचंद्रन अश्विनने जोस बटलरला मंकडिंगद्वारे धावबाद केले होते. क्रिकेटमधला हा नियम खूप जुना आहे आणि त्याची सुरुवात राहुलचे वडील आणि माजी भारतीय क्रिकेटपटू विनू मांकड यांनी केली होती. या कारणास्तव ते मांकडिंग म्हणून ओळखले जातात.