Share

Vitthal temple : मोठी बातमी! पंढरपुरातील सात मजली दर्शन मंडप पाडणार; जाणून घ्या यामागील कारण

विठ्ठल मंदिराची रचना बदलण्यात येणार आहे. विठ्ठल मंदिरा शेजारी उभारण्यात आलेल्या सात मजली दर्शन मंडप पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. माहितीनुसार, आता बालाजीच्या धर्तीवर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात करण्यात येणार आहे.

बालाजी देवस्थानप्रमाणे येथील दर्शन रांगेची व्यवस्था करण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ बालाजी देवस्थानची आणि तेथील दर्शनरांगेची पाहणी करण्यासाठी गेले आहे.

बालाजी येथील आढावा घेऊन त्या धर्तीवर पंढरपुरातील सात मजली दर्शनरांग मंडपाच्या जागी सर्व सोयी सुविधायुक्त दर्शनरांगेचे नियोजन करण्यात येणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तशी शिफारस करण्यात आली आहे. आगामी काळात येथे पार्किंग व कार्यालय उभारण्यात येणार असल्याचं समजत आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक पंढरपूरला येतात. येणाऱ्या भाविकांच्या तुलनेत येथील दर्शन व्यवस्था अपुरी आहे. जलद आणि सुलभपणे विठुरायाचे दर्शन भक्तांना मिळावे यासाठी प्रशासनाने हा आराखडा तयार केला आहे.

वारकऱ्यांचे तिर्थस्थान अशी या पांडुरंगाची आणि पंढरपुरची ओळख आहे. आषाढी वारीचा अनुपम सोहळा पाहाण्याकरता आणि अनुभवण्याकरता लाखोंच्या संख्येने भाविक या पंढरपुरात दाखल होतात. संपूर्ण भाविक पायी चालत दर्शनाला येतात.

चैत्र, आषाढ, माघ आणि कार्तिक या महिन्यांमध्ये चार एकादशींना येथे यात्रा भरते त्यात आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत जवळपास १५ ते २० लाख भाविक या पंढरीत दाखल होतात. पंढरपुरला दक्षिण काशी देखील संबोधतात व विठ्ठलाला कुलदैवत मानल्या जाते.

इतर

Join WhatsApp

Join Now