Share

मोठी बातमी! मुंबईत कलम १४४ लागू, यात्रेदरम्यान दोन गटात तुफान हाणामारी, अनेकांना गंभीर दुखापत

हनुमान जयंतीच्या दिवशी अमरावतीत दोन गटात वाद झाल्याची नुकतीच घटना घडली. या घटनेनंतर आता मुंबईत देखील दोन गटात धार्मिक वादातून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईच्या आरे कॉलनीत दोन गटात तुफान राडा झाल्यानंतर याठिकाणी कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

काल संध्याकाळी मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनीच्या गौतमनगर परिसरात कळस यात्रा काढण्यात आली होती. मात्र या यात्रेत धार्मिक वादातून दोन गटात तुफान मारामारी झाली. ज्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर जवळील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मात्र परिसरातील तणावपूर्ण वातावरण बघता मुंबई पोलिसांनी या भागात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू केली आहे. संबंधीत घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर त्यांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच आरेतील 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

समोर आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलीस दाखल होण्यापूर्वी आरे कॉलनीतील या दोन गटातील वाद शिगेला पोहोचला होता. परंतु पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप नोंदविल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या आरे भागात कलम 144 लागू असल्यामुळे वातावरण शांत झाले आहे.

मात्र तरी देखील याठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान हनुमान जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागात धार्मिक वाद झालेला दिसून आला. मुंबईतील दोन गटातील वादापूर्वीच अमरावतीच्या दोन शहरांमध्ये झेंडा लावण्यावरुन तुफान हाणामारी झाल्याची बातमी समोर आली होती.

तसेच दिल्लीतल्या जहांगीरपूरमध्ये देखील धार्मिक हिंसाचाराची घटना घडली होती. यामुळे दिल्लीत देखील तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. हनुमान जयंतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस तैनाब करण्यात आले होते. मात्र तरी देखील काही भागातील वाद शिगेला पोहोचला.

महत्वाच्या बातम्या
गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींमध्ये वाढ! भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, वाचा काय नेमकं प्रकरण
‘…म्हणून शरद पवारांवर गुन्हा दाखल करायला हवा होता; गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले
माजी पती नागचैतन्याचे तीन टॅटू शरीरावर गोंदवल्याने समंथाला होतोय पश्चाताप? म्हणाली, कधीच..
‘मन उडू उडू झालं’ फेम ह्रता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now