पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला(Sidhu Musewala) यांच्या हत्येची घटना नवीन असतानाच आणखी एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. बॉलिवूडमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र त्याच्या सुरक्षा रक्षकाला सापडलं आहे. सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे बॉलीवूड आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
वाचा नेमकं प्रकरण काय..? सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र त्याच्या सुरक्षा रक्षकाला सापडलं असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे सलमान खान जिथं मॉर्निंग वॉकला जातो आणि विश्रांतीसाठी थांबतो त्याच ठिकाणी धमकीचं पत्र सापडलं आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पत्र पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं असून वांद्रे पोलिसांनी याबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. तसंच या प्रकरणी पोलिसांनी पत्र लिहिणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या तरी या पत्राने बॉलीवूड मध्ये खळबळ उडवून दिली आहे.
वाचा सविस्तर काय लिहिलं होत पत्रात? याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मूसावाला जैसा कर दूंगा”, अशा आशयाचं पत्र आहे. या प्रकरणी पोलीस आता या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याचबरोबर हे धमकीच पत्र कुणी ठेवलं याचा शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वीच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अनेक जणांनी मिळून त्याच्यावर सुमारे 25-30 गोळ्या झाडल्या. या हत्याकांडानंतर सलमानच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं जात होतं. याच पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
केतकी प्रकरणात राज्यपालांची एंट्री, केस CBI कडे जाण्याची शक्यता; वाचा नेमकं काय घडलं..
तापानं फणफणलो होतो, १०२ ताप होता, तरीही…अशोकमामांनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा
प्रचंड वादानंतरही प्राजक्ता माळी म्हणते ‘रानबाजारमधील ‘तो’ सीन माझ्या कारर्किदीतला बेस्ट’
‘मी घरी बसेन पण अन्य कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेणार नाही, शिवसेना माझ्या घरात, माझ्या मनात’