Share

मोठी बातमी! आता वाहन चालवताना फोनवर बोलणे गुन्हा नाही, पण करावे लागेल ‘या’ नियमांचे पालन

जशी जशी लोकसंख्या वाढत आहे, त्याप्रमाणे वाहनांची संख्या देखील वाढत आहे.त् यामुळे अलीकडे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. याच अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अलीकडच्या काळात वाहतुकीचे अनेक कडक नियम आले आहेत. त्यातीलच एक नियम म्हणजे, वाहने चालवताना वाहनचालकाला फोन वरती बोलण्यासाठी घातलेली बंदी. मात्र, आता या नियमात बदल करण्यात आला आहे.

गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं हा कायद्याने गुन्हा आहे. असं केलेलं आढळल्यास वाहतूक पोलीसांकडून कारवाई केली जाते. परंतु येणाऱ्या काळात ही कारवाई होणार नाही. याचे कारण म्हणजे, आता गाडी चालवताना फोनवर बोलणं गुन्हा ठरणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. तसेच लवकरच याविषयीची घोषणा लोकसभेत केली जाईल, असंही ते म्हणाले आहेत.

याविषयी सांगताना ते म्हणाले की, गाडी चालवताना तुम्ही फोनवर बोलू शकता, परंतु बोलत असताना फोन तुमच्या हातात नसावा. हॅण्ड्सफ्री उपकरण म्हणजेच, उदा. इअरफोन, ब्लूटूथ इत्यादी वापरून तुम्ही फोनवर बोलू शकता. फोनवर बोलताना तुमचा मोबाईल तुमच्या खिशात असावा किंवा बाजूला ठेवलेला असावा. या पद्धतीने तुम्ही फोनवर बोलत असाल तर तो गुन्हा ठरणार नाही, असं नितीन गडकरी यांनी सांगितले.

तसेच म्हणाले की, जर तुम्ही गाडी चालवत असताना या नियमांचे पालन करत असाल, आणि फोन वरती बोलत असाल अशा परिस्थितीमध्ये पोलिस तुमच्यावर दंड आकारू शकत नाहीत. जर पोलिसांनी कारवाई केली तर तुम्ही त्याविरोधात कोर्टात जाऊ शकता. हा निर्णय रस्ते अपघात कमी करण्याच्या सरकारच्या ध्येयाशी सुसंगत आहे. असे नितीन गडकरी म्हणाले.

नितिन गडकरी यांनी 2014 पासून वाहतूक मंत्रालयाचा कारभार पाहायला सुरुवात केली तेव्हापासून देशात वाहतूक नियमांमध्ये विविध प्रकारचे बदल करण्यात आले होते. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करत इथेनॉलचा वापर करण्याचीही घोषणा त्यांनी केलेली आहे.

दिल्लीत सततच्या वाढत्या प्रदुषणामुळे 2001 च्या आधीच्या कारगाड्या बंद करण्याचा निर्णय देखील गडकरी यांच्या मंत्रालयाने घेतला होता. त्यामुळे त्यावरही फार चर्चा झाली. त्याचबरोबर मुंबई-दिल्ली आणि समृद्धी महामार्गासह देशातील इतर महामार्गाचं काम तत्परतेने पूर्ण करण्यासाठीही गडकरी यांनी विविध प्रयत्न केले आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now