Share

मोठी बातमी! नितेश राणेंना अटक होणारच? जामीन फेटाळत हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात नितेश राणे यांची सुनावणी पूर्ण झाली असून नितेश राणेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्याविरोधात सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी १८ डिसेंबर रोजी शिवसेनेचे नेते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणेंचा हात आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

या हल्ल्याच्या सूत्रधाराला दिल्लीमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण प्रकरणात नितेश राणेंचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले होते. पोलिसांनी आमदार नितेश राणेंच्या विरोधात अटक वॉरण्ट जारी करण्यात आलं होत. यांनतर आमदार नितेश राणे अटक होऊ नये म्हणून पसार झाले होते.

जिल्हा न्यायालयात आमदार नितेश राणेंनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र जिल्हा न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन फेटाळला होता. नासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयानं नितेश राणेंचा जामीन फेटाळला होता. राणे यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि १२० ब सह ३४ (कटकारस्थान) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारापासून दूर करण्यासाठी शिवसेनेने मला या प्रकरणात अडकवले आहे, असा आरोप अर्जात आमदार नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला होता. यामध्ये माझा सहभाग नसून राजकीय वैमनस्यामधून फिर्याद नोंदवण्यात आली असल्याचा दावाही करण्यात आला होता.

त्यांनतर आमदार नितेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आज या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आणि आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आता कधीही आमदार नितेश राणे यांना पोलिसांकडून अटक होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या :-
माझ्यावर आरोप करणारी महीला कलाकार भाजपशी संबंधीत; किरण मानेंनी उघड केले कनेक्शन
१२ आमदारांचा पत्ता कट?; काँग्रेसमध्ये उडाली खळबळ, सोनिया गांधींच्या प्लॅनने सगळ्यांनाच बसला धक्का
लता मंगेशकर यांची तब्येत आणखी बिघडली, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now