मोठी बातमी! श्रीलंकेला भारताचा सहारा, पाठवले तब्बल ४० हजार मेट्रिक टन पेट्रोल

भारताने आपला शेजारधर्म चांगलाच निभावल्याचे पहायला मिळालं आहे. भारताने आपला शेजारी देश श्रीलंकेला भारताने वाईट काळात मदत केली आहे. श्रीलंकेला भारताने पुन्हा  एकदा  मदतीचा हात दिला आहे. भारताने श्रीलंकेला पेट्रोल पाठवून मदत केली आहे.

भारताने सोमवारी श्रीलंकेला ४०००० मेट्रिक टन पेट्रोल श्रीलंकेला पाठवले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे हे तेल आज पोहचणार आहे. सध्या श्रीलंकेत राजकीय आणि आर्थिक संकट सुरू आहे. भारताने श्रीलंकेला एक अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्जही जाहीर केले होते.

भारताने याआधी श्रीलंकेला २ महिन्यांपूर्वी मदत केली होती. २ महिन्यांपूर्वी श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने ३६ हजार मेट्रिक टन पेट्रोल आणि ४० हजार मेट्रिक टन डिझेल पाठवले होते. भारताने एकूण २.७० लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त इंधन तेल श्रीलंकेला पाठवले आहे.

श्रीलंकेत पेट्रोलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. उर्जा मंत्री विजेसिकेरा यांनी संसदेत सांगितले आहे की, पेट्रोलने भरलेल्या जहाजाचे पैसे देण्यासाठी आमच्याकडे अमेरिकन डॉलर नाहीत. याव्यतिरिक्त त्याच जहाजावर जानेवारी २०२२ मध्ये मागील मालासाठी आणखी ५.३ कोटी डॉलर्स देणे बाकी आहे.

श्रीलंकेत अत्यावश्यक औषधांचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. भारताने या पाश्वभूमीवर श्रीलंकेला औषधांची खेप श्रीलंकेला पाठवली आहे. नॅशनल आय हॉस्पिटल कोलंबोच्या संचालक डॉ. दमिका यांनी सांगितले  की, औषधांचा तुटवडा आहे, त्यानंतर शेजारील देश भारतातून आमच्याकडे क्रेडिट लाइनमध्ये औषधे येत आहेत. भारताकडून ही आमच्यासाठी मोठी मदत होत आहे असे, डॉ. दमिका यांनी सांगितले आहे.

श्रीलंकेत सुरू असलेले  आर्थिक संकट 1948 साली आलेल्या आर्थिक संकटापेक्षा मोठे आहे. श्रीलंकेतील ढासळत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेनंतर, डॉलरच्या तुलनेत श्रीलंकन ​​रुपयाची झपाट्याने घसरण झाली आहे. यामुळे  विदेशी कर्जही वाढू लागले आहे.

महत्वांच्या बातम्या:-
शिवबंधन बांधणार की नाही? राजे म्हणाले, ‘आमचं ठरलंय’!, वाचा नेमकं राजेंच्या मनात आहे तरी काय..
शिवसेनेच्या ‘त्या’ निर्णयामुळे संभाजीराजे कोंडीत, आता उरलाय एकच आधार तो म्हणजे ‘फडणवीस’
जुळे असल्याचा घेतला गैरफायदा, भावाच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य; वाचून पायाखालची जमीन सरकेल