Share

मोठी बातमी! गोव्यातील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीलाही अटक

पणजी। आपल्या दैनंदिन जीवनात अनेक घडामोडी होताना आपण पाहत असतो. खून, दरोडा, अपहरण, अशा प्रकारच्या अनेक बातम्या रोज आपल्या कानावर पडत असतात. मात्र आता आणखी एक सेक्स रॅकेटविषयीची बातमी समोर आली आहे. गोव्या सारख्या शहरात अवैध पद्धतीने सेक्स रॅकेट चालू होते.

गोव्यातील पणजीजवळील सांगोल्डा गावात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. अवैध वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटविषयी पोलिसांना कळताच त्यांनी तिथे धाड टाकली. यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी की या रॅकेट मध्ये मुंबईतील एका टीव्ही अभिनेत्रीलाही अटक करण्यात आले होते.

या घटनेविषयी पोलिसांना विचारले असता त्यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सय्यद बिलाल नावाचा व्यक्ती वेश्या व्यवसायात गुंतला असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पकडण्याचा सापळा रचला.

या व्यवसायातील मुख्य आरोपी हा हैदराबादचा राहणार आहे. त्यांनी रचलेल्या सापळ्याप्रमाणे त्याने सांगोल्डा गावातील एका हॉटेलजवळ ५०,००० रुपये देण्याचा करार केला. आणि त्यानंतर पोलिसांनी तिथे धाड टाकली आणि आरोपी हाफिज सय्यद बिलालसह एका टीव्ही अभिनेत्रीला आणि तीन महिलेला अटक करण्यात आले.

क्राइम ब्रँचने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आरोपी हाफिज सय्यद बिलाल वयवर्ष २६ या आरोपीला १७ मार्च रोजी अटक करण्यात आले. तसेच ३० ते ३७ वर्षे वयोगटातील तीन महिलांसह एका टीव्ही अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

क्राइम ब्रँचने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, यातील टीव्ही अभिनेत्री हि मुंबईजवळील विरार येथील रहिवासी आहे. तसेच त्यातील दोन महिला देखील विरारमधील होत्या आणि एक महिला हैद्राबादमधील रहिवासी होती. या टीव्ही अभिनेत्रीसह या तीनही महिलांची शुक्रवारी सुटका करण्यात आली आहे. याबाबतची माहिती क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

महेंद्रसिंग धोनी नंबर ७ ची जर्सी का घालतो? स्वत:च सांगितली जर्सीमागची इनसाईड स्टोरी

”जलील हे ‘एमआयएम’चा राजीनामा देऊन आले, तर नक्कीच पवारसाहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील”

धोनीवर एखादी वाईट वेळ आली तर सर्वात आधी.., सडकून टीका झाल्यानंतर गौतम गंभीरचे मोठे विधान

“शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे गोपीचंद पडळकरांना कळून चुकलं आहे”

 

 

 

 

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now