Share

Dhar: मोठी बातमी! धरण फुटल्याने २ गावे गेली पाण्याखाली, बचावकार्यासाठी २०० जवान रवाना

karam dharan

धार(Dhar)मध्यप्रदेश धार जिल्ह्यातील ५९० मीटर लांबीचे व ५२ मीटर उंचीचे धरण रविवारी सायंकाळी फुटले आहे. हे धरण करम नदीवर बांधलेले होते. धरणाला जिथून गळती सुरु झाली होती तेथून भिंत फुटली व सुमारे २५ फूट भिंतीचा भाग पाण्यात वाहून गेला. धरणाचे संपूर्ण पाणी वेगाने गावात घुसले. धरणातील पाण्याने पुराचे स्वरूप घेऊन २ गावे पाण्याखाली गेली.

गेल्या काही दिवसातील अति पावसामुळे मातीच्या भिंतीचा काही भाग कोसळला व पूर परिस्थिती निर्माण झाली. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गासह सर्वच मार्ग बंद करण्यात आले आहेत. अति पावसामुळे धोका लक्षात घेता धरण परिसरात येणारी १८ गावे आधीच रिकामी करण्यात आली होती. त्यात धार जिल्ह्यातील १२ गावे तर खरगोण जिल्हातील ६ गावे होती. त्या गावातील जनावरेसुद्धा बाहेर काढण्यात आले आहेत.

प्रशासन गावाबाहेर काढलेल्या लोकांच्या आवश्यक गरजांवर जातीने लक्ष देत आहे. इतकी सतर्कता बाळगूनसुद्धा २ गावे पाण्याखाली गेली. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या प्रशासकीय पथकांनी धरण वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. धरणाचे पाणी वळते करण्यासाठी बायपास कॅनलसुद्धा निर्माण करण्यात आला. यावर गेल्या दोन दिवसापासून निरंतर काम सुरु आहे. तेथील कडक खडकांमुळे
कामाला वेळ लागत आहे.

भारतीय लष्कर आणि एनडीआरएफच्या तुकड्यांकडूनही मदत घेतली जात आहे. करम धरणाच्या ठिकाणी लष्कराचे २०० जवान रवाना झाले आहे. धरण फुटण्याचा धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह एसीएस, एसीएस जलसंपदा आणि एसीएस होम हे भोपाळ कंट्रोल रूममधून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यादरम्यान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी आपला नियोजित जैत दौरा रद्द केला आहे.

सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना निर्माणाधीन धरणातील गळती आणि येथील रहिवाशांच्या बचावासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती दिली. तसेच यासंदर्भात शिवराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती.

महत्वाच्या बातम्या
Abdul sattar : रस्त्यावरील खड्ड्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यु, ध्वजारोहन झाल्यानंतर शिवसैनिकांनी सत्तारांना अडवलं
Vinayak Mete : विनायक मेटेंच्या गाडीला धडक देणारा ट्रक आणि चालक सापडला, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
Sanjay Raut : तुरूंगात संजय राऊत दिवसभरात बराच वेळ करतात ‘हे’ काम, हाती असते वही अन् पेन
Sanjay Raut : तुरूंगात संजय राऊत दिवसभरात बराच वेळ करतात ‘हे’ काम, हाती असते वही अन् पेन    

आरोग्य इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now