एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का येत्या काळात बसणार असल्याचे बोलले जात होते. परंतु या बाबतीत एक मोठी अपडेट समोर येत आहे. (Big earthquake soon in Congress! Senior leader Ashok Chavan will join BJP?)
काँग्रेस नेते अशोक चव्हाण सभागृहात अधिवेशनावेळी उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना मतदानाला मुकावे लागले होते. त्यामुळे ते नाराज आहेत. ते लवकरच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र अशोक चव्हाण यांनी याबाबत मोठा खुलासा केला.
अशोक चव्हाण म्हणाले की, ‘मी पक्ष सोडणार नाही. माझ्या बाबत ज्या उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत, अशा चर्चांना काहीच अर्थ नाही.’ अशोक चव्हाण यांनी असे स्पष्टीकरण दिल्याने काँग्रेस पक्ष ते सोडणार आहेत, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
विधानसभेत अधिवेशनादरम्यान अशोक चव्हाण सभागृहात उशिरा पोहोचले होते. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. या घटनेनंतर अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने पक्षाविरोधात कारवाई केल्यामुळे कारणे दाखवा अशी नोटीस बजावल्याची देखील चर्चा होती.
असे कोणते नोटीस नाही. माझी कोणत्याही बाबतीत पक्षावर नाराजी नाही. मी पक्ष सोडणार नाही, अशा प्रकारचे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांच्याकडून आल्यामुळे या चर्चा तूर्तास थांबल्या आहेत.
मुंबई बॉम्बस्फोटावेळी तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर उलटसुलट आरोप झाल्याने त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी २००८ ते २०१० रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
महत्वाच्या बातम्या-
मला संजय राऊतांचा अभिमान, त्यांचा मरण आलं तरी शरण जाणार नाही हा बाणा मला आवडतो – उद्धव ठाकरे
शिवसेना काहीच दिवसांत संपून जाईल; जे.पी. नड्डांच्या या वक्तव्यावर ठाकरे संतापले; म्हणाले दुसऱ्यांना संपवण्याच्या नादात…
singer: ‘हर हर शंभू’ गाणे गायल्याने इंडियन आयडल फेम गायिकेवर भडकले मुस्लिम कट्टरपंथी, म्हणाले…