Share

मुंबई पोलीस इन ऍक्शन मोड! ‘या’ वेळेत भोंगे वाजवण्यास बंदी, नियम मोडल्यास होणार कारवाई

bhonge
लाऊडस्पीकरबाबत एक मोठी बातमी आता समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकरवर आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाउडस्पीकर वाजवू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याच देखील सांगण्यात आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय काढल्यानंतर यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.

अनेक मशिदी आणि मंदिरे कायदेशीररित्या बांधली गेली आहेत, परंतु जी बेकायदेशीर आहेत किंवा सर्व नियमांचे पालन न करता बांधलेली आहेत, त्यांना लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत त्यांनाच लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाईल.

लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद किंवा मंदिराची रचना कायदेशीर आहे की नाही हे देखील पाहिले जाईल असही पोलिसांनी सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी दिलेल्या आदेशाची मुंबई पोलिसांकडून आता  अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक टीम ही तयार केली आहे. कंट्रोल रूमला जर कॉल आला तर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याच देखील पोलिसांनी सांगितले आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्या राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे DGP राजनाथ सेठ यांची मशिदीत लाऊडस्पीकरवर बैठक घेणार आहेत. महाराष्ट्र सरकार लवकरच लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे, असे देखील गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now