Share

‘आप’ की सरकार, काम की सरकार! 4 दिवसात घेतले 4 धडाकेबाज निर्णय; घ्या जाणून..

aap cabinet

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. मात्र पंजाब मध्ये ‘आप’ने बाजी मारली असून भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने विजय मिळवला असून दोन तृतीयांश बहुमताने सत्ता स्थापन केली. याचबरोबर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार, आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये 117 जागांपैकी 92 जागा जिंकल्या.

तर काँग्रेसला केवळ 18 जागा जिंकता आल्या. शिरोमणी अकाली दल तीन जागा आणि भाजपने दोन जागा जिंकल्या, तर बसपने एक जागा जिंकली आणि अपक्षांनीही एक जागा जिंकली. पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने ९२ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

तसेच बुधवारी आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहेत. हा भव्य शपथविधी सोहळा १०० एकराच्या परिसरात झाला. यातील ४४ एकरवर मंडप उभारण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याला सुमारे ३ ते ४ लाख लोक उपस्थित होते.

तर दुसरीकडे पंजाबमधील सत्तेची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 4 दिवसात 4 मोठे निर्णय घेतले आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीच्या संधी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी, माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा, असे निर्णय घेण्यात आले आहेत.

https://www.facebook.com/AamAadmiParty/posts/4690293681070355

शनिवारी भगवंत मान मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पंजाब पोलीस विभागात १०,०० आणि इतर सरकारी विभागांमधील १५,००० रिक्त पदांसह एकूण २५,००० सरकारी नोकऱ्या प्रदान करण्याचा ठराव मंजूर केला. याचबरोबर पंजाबमधील महामंडळ आणि सरकारी कार्यालयांमधील रिक्त पदेही भरणार आहे.

तसेच आम आदमी पक्षाचा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पहिल्या कॅबिनेट बैठकीत २५,००० रिक्त पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. ‘भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये यापुढे भ्रष्टाचार चालणार नाही,” असे मान यांनी ट्वीट काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते.

तर पंजाबचे मुख्यमंत्री होण्याआधीच भगवंत मान यांनी शपथविधीपूर्वीच 122 माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेण्याचे निर्देश दिले होते. ‘पोलीस नेत्यांच्या घराबाहेर तंबू ठोकून त्यांची सुरक्षा करत आहेत. मात्र, त्यांना त्यांचे काम करू द्यावे. राज्यातील पावणेतीन कोटी लोकांना सुरक्षेची गरज असल्याचे त्यांनी म्हंटल होतं.

महत्वाच्या बातम्या
बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची क्रेझ कायम, पहिल्या दिवशी ‘बच्चन पांडे’ने कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एमआयएमला सामिल करून घेणार?
गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील शाळेत देखील भगवद्‌गीता शिकवली जावी; भाजपने केली मागणी
मोठी बातमी! ‘या’ चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी प्रभासचा अपघात, डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया, चाहते चिंतेत

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now