Share

Corruption : भाजप मंत्र्याच्या कामगाराचा प्रताप! पगार १० हजार अन् राहतोय अडीच कोटीच्या घरात, सांभाळतोय ४ बायका

mp corruption case

Corruption: मध्यप्रदेश वनमंत्री विजय शाह यांच्या गॅस एजंन्सीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. १० हजार पगारावर कामाला असलेल्या एका असिस्टंट मॅनेजरने तब्बल १६ लाखांपेक्षा जास्त रकमेची बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली. त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्या व्यक्तीकडे सापडलेली रक्कम आणि त्याचे कोट्यवधींचे आलिशान घर बघून पोलीस पण चक्रावले.

अनेक वर्षांपासून बिंशु भालेराव नावाचा व्यक्ती शाह यांच्या गॅस एजंन्सीमध्ये काम करत होता. भालेराव त्यामुळे शाह कुटुंबाच्या विश्वासातील आणि जवळचा बनला होता. मात्र याच गोष्टीचा गैरफायदा त्याने घेतला. भालेराव विरोधात गॅस एजंन्सीमधील एका कर्मचाऱ्याने तक्रार केली. त्यानंतर पोलीस चौकशीमध्ये हे धक्कादायक प्रकरण समोर आले.

पोलिसांनी केलेल्या तपासात भालेराव या असिस्टंट मॅनेजरच्या बँक खात्यावर १६ लाखांपेक्षा जास्त रक्कम आढळून आली. तसेच शहराच्या महत्वाच्या मध्यवर्ती भागात त्याचे अडीच कोटींचे आलिशान घर आहे. त्यामुळे केवळ १० हजार पगारावर त्याने हे सगळं कसं मिळवलं? हाच प्रश्न सगळ्यांना पडतो आहे.

खांडवा भागात वनमंत्री विजय शाह यांची दिव्य शक्ती नावाने गॅस एजंन्सी आहे. त्याचा कारभार शाह यांची सून पद्मिनी बघतात. मात्र त्या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर असलेला भालेराव हा व्यक्ती गॅस एजंन्सीतील सर्व कामकाज सांभाळायचा. तो अनेक वर्षांपासून तिथे काम करत असल्याने त्याच्यावर शाह कुटुंबाने विश्वास ठेवला. मात्र २०२० ते २०२२ दरम्यानच्या काळात लाखोंचा भ्रष्टाचार भालेरावने केलाय, असा आरोप सुभाष केसरीया या कर्मचाऱ्याने केला.

पुढे भालेराव या असिस्टंट मॅनेजरची कसून चौकशी झाली. त्यातून पुढे भालेरावचे बिंग फुटले. या व्यक्तीला ४ बायका असून त्या शहराच्या वेगवेगळ्या भागात राहतात. त्या सर्वांचा सांभाळ तो गॅस एजंन्सीमधील नोकरीवर करतो. दुसरे कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन त्याच्याकडे नाही.

१० हजार पगारातून त्याला हे शक्यच नव्हतं. त्यामुळे नोकरीतून भ्रष्टाचार करून मोठं घबाड त्याने मिळवलं असल्याचे स्पष्ट झालं. पोलिसांनी कलम ४०९ , कलम ४२० अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करत भालेरावला बेड्या ठोकल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
Congress : काॅंग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंना हटवून ‘या’ नेत्याला करणार प्रदेशाध्यक्ष
Shivajirao Adhalrao Patil : शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळरावांचा पत्ता कट? भाजप केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाने टेंशन वाढले
vinayak raut : विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक ; थेट आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now