ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्याच्या नियमात मोठा बदल, आता RTO ला जाऊन टेस्ट द्यायची गरज नाही

कोणी नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढणार असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात मोठा बदल केलेला आहे. त्यामुळे हा बदल नेमका कोणता आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

तुम्ही नवीन ड्रायव्हिंग लायसन्स घेण्याच्या विचारात असाल तर ही केंद्र सरकारची नवीन नियमावली बद्दल जाणून घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. नेमकी ही नियमावली काय आहे ती जाणून घेऊयात. तर,नवीन नियमानुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही.

तुम्हाला आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करावी लागेल. ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल अर्जदारांनाही  ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रमाणपत्र दिले जाईल.

त्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराला ड्रायव्हिंग लायसन्स जारी केला जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे नियम अधिसूचित केले आहेत, हे नियम या महिन्यापासून लागू झाले आहेत. केंद्र सरकारने केलेल्या या नवीन बदलांमुळे आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या प्रतिक्षा यादीत पडलेल्या कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळणार हे नक्की.

याचा कोणीही गैरफायदा घेऊ नाही, यासाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कुलसाठी देखील काही नियम आहेत. ट्रेनर किमान १२ वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, त्याला वाहतूक नियमांचे चांगली माहिती असली पाहिजे.

टु व्हिलर, थ्री व्हिलर आणि फोर व्हिलर वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांजवळ किमान एक एकर जागा असणे आवश्यक आहे. तर मध्यम आणि अवजड प्रवासी वस्तूंच्या वाहनांसाठी किंवा ट्रेलरसाठी दोन एकर जागा आवश्यक आहे. हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी कोर्सचा कालावधी कमाल ४ आठवडे २९ तासांपर्यंत असेल.