फलंदाजीला येणाऱ्या फलंदाजासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये आता मोठे बदल करण्यात आले आहेत. हा बदल झेलबाद होणाऱ्या खेळाडूंबद्दल आहे. आता तो बदल नेमका काय याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
यापूर्वी जर एखाद्या फलंदाजाने मोठा फटका मारला आणि तो झेलबाद झाला तेव्हा पंचांना नियम पाहून पुढचा खेळ सुरु करावा लागत होता. म्हणजेच जर एखादा खेळाडू झेल बाद झाला आणि त्याचवेळी जर दोन्ही फलंदजांना एकमेकांना क्रॉस झाले तर नॉन स्टाइकचा फलंदाज हा खेळण्यासाठी सज्ज व्हायचा.
त्याचवेळी नवीन येणारा फलंदाज हा नॉन स्ट्राइकला जायचा आणि त्याला थेट फलंदाजी करण्याची संधी मिळायची नाही. परंतु आता या नियमात बदल करण्यात आला आहे. या नियमांनुसार जर एखादा खेळाडू झेल बाद झाला तर नवीन येणारा खेळाडू हा थेट फलंदाजीला जाऊ शकतो.
त्यामुळे मैदानात आल्यावर लगेचच नवीन फलंदाजाला चेंडू खेळण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, करोनामुळे थुंकी वापरण्यास बंदी घातल्याने खेळाडू घामाचा वापर चेंडू चमकावण्यासाठी करत होते. नव्या नियमानुसार थुंकी लावता येणार नाही.
चेंडूवर थुंकी लावण्यासाठी खेळाडू साखरेच्या काही पदार्थांचा वापर करत असत. यामुळे चेंडूवर थुंकी लावणे म्हणजे त्याच्या स्थितीमध्ये बदल केल्याचे होईल. म्हणून आता चेंडूवर खेळाडूंना थुंकी लावता येणार नाही. थुंकी लावल्याने चेंडूच्या स्विंगवर कोणताही परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
क्रिकेटमधील हे सर्व नियम 1 ऑक्टोबरपासून लागू केले जातील. क्रिकेटच्या बदललेल्या नियमांचा इतिहास पाहिला तर दिसते की, क्रिकेटच्या नियमात 2017 साली बदल झाल्यानंतर खेळ अनेक प्रकारे बदलला आहे. 2019 मध्ये झालेले बदल किरकोळ स्वरुपाचे होते. पण आता 2022 मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.