Share

बिग ब्रेकींग! नितेश राणेंच्या गाडीचा अपघात; ट्रकने पाठीमागून दिली धडक

महाराष्ट्रातील अपघातसत्र थांबायचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अपघातात अनेक प्रसिद्ध राजकीय नेते आणि उद्योगपतींना आपला जीव गमवावा लागला. नुकतेच ऑगस्टमध्ये विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला, त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी अपघातात जीव गेला.

सायरस मिस्त्री यांचा अपघात ताजा असतानाच आता भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यानजीक हा अपघात घडला असून सुदैवाने यात कोणीही जखमी नाही.

नितेश राणे यांच्या पत्नी आणि मुलगा सोमवारी सायंकाळी मुंबईतून पुण्याकडे निघाले. त्यादरम्यान टोल नाक्यावर त्यांच्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली. अपघातामध्ये वाहनांचे थोडेफार नुकसान झाले आहे. मात्र राणे कुटुंबियांसह सर्वजण सुखरुप आहेत.

गाडीला पाठीमागून धडक दिल्याने गाडीच्या मागच्या बाजूचा इंडिकेटर फुटला आहे. दरम्यान, या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातामागे नेमकं काय कारण आहे याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. ट्रकचा ब्रेक दाबताना हा अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे रविवारी अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री गाडीने अहमदाबादहून मुंबईकडे येत होते. अपघातावेळी गाडीत चार जण होते. मुंबई जवळ पालघर येथे त्याची गाडी एका डिव्हायडरला धडकली आणि अपघात झाला.

माहितीनुसार, ही गाडी अनाहिता पंडोले या चालवत होत्या. त्या एक प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आहेत. गाडीत अनाहिता यांचे पती डेरियस पंडोले आणि जहांगीर दिनशा पंडोले देखील होते.अपघातात अनाहिता आणि त्यांचे पती यांना गंभीर दुखापत झाली आहे, तर सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now