बिग ब्रेकींग! काँग्रेसने ‘मविआ’चा हात सोडला; ‘या’ निर्णयामुळे शिवसेनेला बसणार फटका

राज्यसभा निवडणुकीचे आज मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच, आता काँग्रेसच्या दोन मतांचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या विजयासाठी अगदी एक – एक मत महत्वाचं बनलं आहे. सोबत अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांच्या हातात विजयाची चावी आहे. असे असताना, काँग्रेसच्या दोन मतांचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसने एका उमेदवाराला फटका बसू नाही यासाठी ४२ मतांच्या ऐवजी ४४ मतांचा सुरक्षित कोटा देण्याचे निश्चित केले आहे.

काँग्रेसने ज्या उमेदवारासाठी ४२ ऐवजी ४४ मतांचा सुरक्षित कोटा निश्चित केला आहे, तो उमेदवार म्हणजे इम्रान प्रतापगडी आहेत. काँग्रेसच्या या निर्णयामुळे आता महाविकास आघाडीला नक्कीच फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.

काँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश वरपुडकर यांनी तसा पक्षादेश जारी केला आहे. त्यात केवळ काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनाच मतदान करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र यात दुसऱ्या क्रमांकाचे मत कुणाला द्यायचे याबाबत कोणताच आदेश नसल्याने आमदार संभ्रमात आहेत.

त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि एकूणच महाविकास आघाडीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या काँग्रेसचे आमदार पवई येथील वेस्ट इन हॉटेल मध्ये आहेत, तिथेच या आमदारांच्या हातात पक्षादेश देण्यात आला आहे. जो पक्षादेश सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

सध्या काँग्रेसकडे ४३आमदार आहेत, तर विजयी होण्यासाठी ४१मतांची गरज आहे. त्यामुळे सुरक्षित विजयी होण्यासाठी अतिरिक्त ३ मत जर इम्रान प्रतापगढी यांनाच दिली, तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना काँग्रेसच्या एकाही मताचा फायदा होणार नाही हे निश्चित आहे.

त्यातच, दुसऱ्या क्रमांकाची मते कोणाला द्यायची याबाबत पक्षादेश मध्ये काहीही आदेश नाही यामुळे काँग्रेसचे आमदार दुसऱ्या क्रमांकाची मते कोणाला देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसने काढलेल्या या पक्षादेश मागे काँग्रेसमध्ये असलेली नाराजी असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.