Share

सिमेंट उद्योगाला मोठा धक्का, कंपन्या चालल्या भारत सोडून; ACC, अंबूजासारख्या कंपन्या विक्रीला

सिमेंट जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी होल्कीम ग्रुपने भारतातील 17 वर्षांत उभारलेला डोलारा गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. या ग्रुपने त्यांच्या अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड या दोन्ही लिस्टेड कंपन्यांना भारतात विक्रीसाठी ठेवले आहे.

माहितीनुसार या कंपन्यांनी कोअर मार्केटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ग्लोबल स्ट्रॅटेजी तयार केली आहे. भारतातून बाहेर पडणे याच स्ट्रॅटेजीचा भाग आहे. त्यामुळे, अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड या दोन्ही लिस्टेड कंपन्यांना होल्कीम ग्रुपने विक्रीसाठी ठेवले आहे.

एवढेच नाही तर होल्कीम ग्रुप आपला भारतातील व्यवसाय विकण्यासाठी जेएसडब्लू आणि अदानी ग्रुपसह अन्य कंपन्यांशी चर्चा करत आहे. या दोन्ही कंपन्यांनी काही काळापूर्वीच सिमेंट उद्योगात प्रवेश केला आहे. दोन्ही उद्योग समूहांनी या उद्योगात मोठी झेप घेण्याची तयारी केली आहे.

मात्र, असे असले तरीदेखील दुसरीकडे श्री सिमेंटसारख्या कंपन्यांशी देखील संपर्क साधण्यात आला आहे. होल्कीम ग्रुपच्या दोन्ही एसीसी आणि अंबुजा सिमेंटच्या उत्पादन क्षमता बाबत बोलायचे झाल्यास याची उत्पादन क्षमता 66 दशलक्ष टन आहे. त्यामुळे जो कोणी या कंपन्या खरेदी करेल तो नक्कीच भारतीय बाजारात अचानक दबदबा निर्माण करेल.

भारतीय सिमेंट बाजारात आदित्य बिर्ला यांची अल्ट्राटेक कंपनी सर्वात मोठी कंपनी आहे. अल्ट्राटेक दरवर्षाला 117 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन घेऊ शकते. होल्कीम बद्दल अधिक माहिती म्हणजे, होल्कीम ही मूळची स्वित्झर्लंडची कंपनी आहे. तिला फ्रान्सच्या बड्या कंपनीने Lafarge ने विकत घेतलं आहे.

याचे विलीनीकरण करण्यात आलं आहे. यामुळे या कंपनीचे नाव LafargeHolcim असे आहे. ही जगातील सर्वांत मोठी सिमेंट कंपनी बनली. या कंपनीने पुढे युरोपसह आशियाच्या बाजारातील कंपन्या ताब्यात घेण्यासाठी कायद्यानुसार काही मालमत्ता विकल्या, आणि आशियाई बाजारातील कायद्यानुसार काही बदल करत Holcim Group अशा नावाने रिब्रँड करण्यात आले.

इतर

Join WhatsApp

Join Now