तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात बुधवारी रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का लागून १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु त्यांचीही प्रकृती नाजूक असल्याचे म्हणले जात आहे.
बुधवारी तंजावर जिल्ह्यात मंदिर उत्सवात रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळीच रथाचा वरून जाणाऱ्या विजेच्या तारेला स्पर्श झाला. यामुळे संपूर्ण रथात करंट पसरला आणि रथाला आग लागली. या आगीत रथाजवळ असणाऱ्या नागरिकांना गंभीर दुखापत झाली. तसेच १० लोकांनी आपले प्राण गमावले.
यानंतर दुर्घटनेची माहिती पोलिसांना लागताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमी लोकांना रूग्णालयात दाखल केले. तसेच सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत माहिती देत आयजी व्ही बालकृष्णन यांनी सांगितले आहे की, या घटनेत १० लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
सध्या इतर जखमींवर उपचार सुरू असले तरी त्यांची प्रकृती नाजूक आहे. आम्ही या घटनेची पूर्ण पडताळणी करत आहोत. दरम्यान या मंदिरात ९४ वा उच्च गुरुपूजा उत्सव साजरा केला जात होता. मंगळवारपासूनच मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली होती.
तर दुसऱ्या दिवशी देखील रथयात्रा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. मात्र या घटनेमुळे रथयात्रा पूर्ण होऊ शकली नाही. तब्बल दोन वर्षांनंतर मंदिराच्या उत्सवासाठी भाविक जमा झाले होते. आता या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या
बंगालमधील भाजपचे सर्वात मोठे नेते शुभेंदू अधिकारींचे बंडखोरीचे संकेत; भाजपमध्ये खळबळ
लग्नानंतर आपल्या सासरच्यांसाठी आलियाने बनवली मसालेदार भाजी, सगळ्यांची होती ‘ही’ रिऍक्शन
नितेश राणे यांना आपल्याच मतदार संघातील गावात जाण्यास बंदी, धक्कादायक कारण आले समोर
१८ दिवस फक्त पाणी प्यायलो, एका पोलिसाचा जीव वाचवला; सदावर्तेंनी सांगितला जेलचा हैराण करणारा अनुभव