सध्या सोशल मिडीयावर कच्चा बदाम हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्यावर अनेक तरुणांनी तसेच बॉलिवूड कलाकारांनी व्हिडीओ तयार केले आहेत. इतकेच नव्हे तर काहींनी डान्स करत तर काहींनी फनी व्हिडीओ शेअर करत या गाण्याला लोकप्रियता मिळवून दिली आहे.
कच्चा बदाम हे गाणे एका भुईमुग विकणाऱ्या भुवन बडायकर या व्यक्तीने गायले आहे. भुवन बडायकर बीरभूममधल्या सुंदर गावातील रहिवासी आहे. या गाण्याच्या प्रसिध्दीनंतर भुवनला एक गायक म्हणून वेगळी ओळख मिळाली आहे.
परंतु प्रसिध्दी मिळताच भुवनने एका वेगळ्या भितीविषयी वक्तव्य केले आहे. कोलकतामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना, भुवनने आपल्याला मोठे केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर आपण आता सायकलीवरुन भुईमुग विकत नसल्याची माहिती यावेळी त्याने दिली आहे.
मुख्य म्हणजे मला मिळालेल्या प्रसिध्दीनंतर माझ्या शेजारच्यांनी मला भुईमुग न विकण्याचा सल्ला दिला आहे. कारण की, मी बाहेर गेल्यास कोणीतरी माझे अपहरण करेल अशी भिती त्यांना सतावत असल्याचे भुवनने सांगितले आहे.
त्यांची ही काळजी बघून आपण भुईमुग विकणे बंद केल्याची माहिती भुवनने उपस्थितांशी संवाद साधताना दिली आहे. या कार्यक्रमात भुवनने आपल्या गाण्याचे सादरीकरण केले. तसेच आपण एकेकाळी सायकलीवर फिरुन भुईमुग विकत असल्याचे आणि गरीबीतुन दिवस काढल्याचे सांगितले.
दरम्यान कच्चा बदाम गाण्यांच्या प्रसिध्दीनंतर भुवनला खुप मोठमोठ्या ऑफर आल्या आहेत. एका म्युझिक कंपनीने त्याला दीड लाखांची ऑफर दिली आहे. सोशल मिडीयाने अनेकांचे आयुष्य बदलुन टाकल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. यामध्ये आता भुवन बडायकरचा देखील समावेश झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
शिवसेना, राष्ट्रवादी ‘यासाठी’ नितीश कुमारांना देणार पाठिंबा, करणार मोठा धमाका
कॅच सोडल्यामुळे संतापला पाकिस्तानी खेळाडू, दुसऱ्या खेळाडूच्या मारली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल
‘पतीला डावलून पर पुरुषाला सतत फोन करणे म्हणजे वैवाहिक क्रूरताच’, हायकोर्टाची टिप्पणी
‘या’ तारखेनंतर दिशा सालियन मृत्यु प्रकरणाचा उलगडा होणार, सर्व पुरावे तयार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट