Share

सतत भुमरे कानात येऊन सांगत होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणतीच घोषणा केली नाही; भुमरेंचा कार्यक्रम फेल

Eknath Shinde

पैठणमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कालची सभा अनेक कारणांनी चांगलीच रंगली. शिंदे यांच्या स्वागताची भुमरे पिता-पुत्रांनी केलेली तयारी असो किंवा एकनाथ शिंदेंच्या सभास्थळी झालेली पळवापळवी असो..! कालचा दिवस तसा राजकीयदृष्ट्या अनेक कारणांनी चर्चेत होता.

शिंदेंच्या जाहीर सत्काराच्या निमित्ताने रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा शक्तीप्रदर्शन करण्याचा उद्देश यानिमित्ताने सफल झाला खरं..! मात्र शिंदेंच्या भाषणादरम्यान जे घडलं त्यावरुन असं लक्षात येतं आहे की, भुमरे यांच्या पदरी निराशा आली. वाचा नेमकं घडलं काय? भुमरेंच्या पदरी निराशा का आली?

खरं तर मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच राजकारण तापलं होतं. सभेला पैसे देऊन गर्दी जमविल्याचा आरोप विरोधकांनी भुमरे यांच्यावर केला. त्यानंतर सभेदरम्यान एक वेगळाच प्रकार पाहिला मिळाला. मुख्यमंत्री शिंदे यांची पेढ्यांनी तुला करण्यात येणार होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी ही ‘पेढे तुला’ करण्यास नकार दिला.

त्यानंतर उपस्थित नागरिकांनी अवघ्या काही सेकंदात जवळपास १०० किलो लाडू व पेढे लोकांनी पळवून नेले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पैठणमध्ये येऊन संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणी क्लस्टर, रस्त्यासाठी निधीची घोषणा करतील अपेक्षा होती. मात्र तसं काहीही घडलं नाही.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान, पाहायला मिळालं की, पैठणसाठी मुख्यमंत्री मोठी घोषणा करतील या अपेक्षेने भुमरे भाषण संपेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या मागे सतत फिरत होते. एवढंच नाही तर, मुख्यमंत्र्यांच्या कानात जाऊन काही तरी सांगत होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने पैठणसाठी दिलेला निधी याचा उल्लेख भाषणात केला.

या प्रकारामुळे भुमरेंचा कार्यक्रम फेल गेल्याच बोललं जातं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी ही सभा आयोजित केली होती. संदीपान भुमरे यांनी या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. यासंबंधी एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray : मनसे – शिंदे गट महापालिका निवडणूका एकत्र लढवणार?, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Garba : आता गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश नाही; लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मोठा निर्णय
दाभोळकर हत्या तपासाबाबत कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची पोलखोल करत केला ‘हा’ दावा
“यापुढे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत”, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंची उडाली झोप

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now