राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत आणि सातबारा उतारा देखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. यासाठी भूमी अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे.(bhumi-abhilekh-deparatment-big-decision-satbara-utara-band)
यामुळे पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळता येणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये या प्रणालीचा वापर करून माहिती जमा केली जाणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवला जाणार असल्याची माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली आहे.
जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी अनेक ठिकाणी सोईनुसार सातबारा उतार्यांचा वापर केला जातो. यामुळे फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. या कारणांमुळे भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सिटी सर्व्हे झाला असेल तर सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणे आवश्यक आहे. तरीसुद्धा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत.
सिटी सर्व्हे झाला आहे, परंतु सातबारा उतारा नाही, अशाही काही जमिनी आहेत. त्यातून अनेक घोळ निर्माण होऊन न्यायालयीन खटल्यांची संख्याही वाढत आहे. या सर्व प्रकारांना आळा घालणे आणि त्यामध्ये सुसूत्रता आणणे या हेतूने भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी एनसआयसीच्या माध्यमातून संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे.
या संगणक प्रणालीतून घोळ असणाऱ्या सर्व जमिनींची माहिती जमा केली जाणार आहे. त्यानंतर अशा सर्व जमिनींचे सातबारा उतारे बंद करून प्रॉपर्टी कॉर्ड सूरू ठेवण्यात येणार आहे. भविष्यात प्रॉपर्टी कार्ड हे एकच रेकॉर्ड मालमत्तेसंदर्भात भूमी अभिलेख विभागाकडून तपासले जाणार आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगाने होणार आहे.
या निर्णयामुळे नागरिकांची होणारी फसवणूक टाळता येणार आहे. या निर्णयामुळे प्रॉपर्टी कार्डवर मिळकतीचे सविस्तर वर्णन, क्षेत्राची नोंद आणि नकाशा असणार आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्री संदर्भातील गैरप्रकार रोखणे शक्य होणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
राष्ट्रवादीने पाडले काँग्रेसला मोठे भगदाड, महापौरांसह सर्व २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
लेक चालली सासरला! अलका कुबल यांच्या लेकीचा थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, पहा खास फोटो
पुनम महाजनांनी नामर्द म्हटल्यानंतर संजय राऊत संतापले; म्हणाले, भाजपमध्ये पुनम महाजनांचं..