बुलढाणा(Buldhana): सांगली जिल्ह्यातील नुकताच घडलेला प्रकार म्हणजे साधूंना मुले पळवणारी टोळी समजून मारहाण करण्यात आली. त्याच घटनेची पुनरावृत्ती बुलढाणा जिल्ह्यात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे १४ सप्टेंबरला तृतीयपंथीयाला मुले पळवणारी समजून जोरदार मारहाण करण्यात आली. हा प्रकार १४ सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास घडला.
याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. मारहाण झालेल्या तृतीयपंथी व्यक्तीचे नाव सायरा मोगरा जान आहे. सायरा अकोट येथील फॅशन शो बघून मलकापूरकडे जात होती. त्यासाठी ती ऑटोमध्ये बसली. त्या ऑटोवाल्याने अज्ञात व्यक्तीला फोन करून सांगितले की, एक महिला माझ्या ऑटोमध्ये बसली आणि ती मुलं चोरायला आली आहे.
त्यामुळे जळगाव जामोद येथील जुना बस स्टॉप परिसरातील नागरिकांनी मुलं चोरणारी टोळी समजून तिला मारहाण केली. मारहाण केल्यांनतर नागरिकांनी सायराला पोलीस स्टेशनमध्ये नेले. चौकशी केली असता माहीत पडले की, सायरा मुलं चोरणाऱ्या टोळीशी संबंधित नाही. मारहाणीमुळे सायरा जखमी झाली आहे.
सायराला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायराने मारहाण करणाऱ्या लोकांविरोधात तक्रार केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सायराने पोलिसांकडे केली आहे. सायराला मारहाण केल्याची घटना कॅमेरात कैद झाली होती. त्या आधारे पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे.
सायरा मुळची मलकापूर शहरातील आहे, परंतु जळगाव जामोद येथे राहते. सध्या सर्वत्र मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे लहान मुलं व त्यांचे पालक चिंतेत आहेत. सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. ही भीती लवकर घालवणे घरजेचे आहे. अन्यथा या घटना अशाच चालू राहतील. सायरा प्रकरण हे राज्यातील आतापर्यंतचे तिसरे प्रकरण आहे.
या घटनेबाबत तृतीयपंथीयांचे नेते मोगराबाई यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा तृतीयपंथी स्वतः जमावाला धडा शिकवेल असेही मोगराबाई म्हणाल्या. तृतीयपंथीयांच्या या इशाऱ्यामुळे पोलीस निरीक्षक झपाट्याने कामाला लागले आहे. उरलेल्या ३ जणांचा शोध ते लवकरच घेतील, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
Shinde Group : शिंदे गटातील बड्या मंत्र्याचा भ्रष्टाचार आला समोर; जावयाच्या माध्यमातून झाला मोठा घोटाळा
Sanjay Shirsat : मंत्रीपद नाकारल्यानंतर संजय शिरसाटांना पुन्हा धक्का; एकनाथ शिंदेंनी पुन्हा डावललं
Foxconn: …तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती; वेदांताबाबत देसाईंचा मोठा खुलासा
shinde group : ४० गद्दारांनी शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा प्रयत्न केला तर कुदळ फावड्यांनी…; शिवसेनेची शिंदेगटाला जाहीर धमकी






