मुलीचे लग्न जुळत नाही म्हणून बाबाकडे गेलेल्या महिलेवर आणि तिच्या मुलींवर बलात्कार करण्यात आला आहे. हा बलात्कार भोंदूबाबा आणि त्याच्या वकील भावाने केला आहे. एवढेच नाही तर बलात्काराचे व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून आठ लाख रुपये सोबतच दोन वर्षे चार महिने वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
ही घटना नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात घडली आहे. मुलीचे लग्न जमत नसल्याने येवला तालुक्यातील नागडे गावातील एक महिला एका भोंदूबाबाकडे गेली होती. तेव्हा या बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे, असे सांगितले. त्यानंतर त्याने आणि त्याच्या वकील भावाने आईसह 3 मुलींवर बलात्कार केला.
एवढेच नाही तर, भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने अत्याचाराचे व्हिडिओ शुटींग केले होते. हे शुटींग दाखवून ते ब्लकमेल करायचे. त्यांनी आतापर्यंत या कुटुंबाकडून 8 लाख रुपये उकळले होते. तसेच आईसह तीन मुलींवर दोन वर्षे चार महिने वेळोवेळी अत्याचार केला. शेवटी या जाचाला कंटाळून या कुटूंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.
त्यांच्या सोबत झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. भोंदूबाबा आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला. भोंदूबाबाने अत्याचार केला. पैसे वसूल केले. त्यानंतर या पीडितांच्या मनात हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण केला. त्यांना मुस्लीम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केल्याची फिर्यादही पीडितेने पोलिसांकडे नोंदवली आहे.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी येवला पोलिसांनी भोंदूबाबा आणि त्याचा भाव या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. बलात्काराच्या या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. वाढती गुन्हेगारी कधी थांबणार, याचीच चिंता सुज्ञ व्यक्त करत आहेत.
नुकतीच नाशिक मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस हे दुहेरी हत्याकांड, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून चर्चेत असताना आता हे नवीनच प्रकरण समोर आल्याने नाशिककरांपुढे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.