भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. अक्षरा सतत आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. तिच्या या व्हिडिओ आणि फोटोंना चाहते देखील भरभरून प्रतिसाद देत असतात. नुकताच अक्षराने असाच एक सुंदर व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत ती मराठी गाण्यावर लावणी करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते घायाळ झाले आहेत. विशेष म्हणजे, अक्षराने यावेळी चक्क बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ चित्रपटामधील चंद्रा गाण्यावर लावणी सादर केली आहे. यासाठी तिने मराठमोळी साज शृंगार केला आहे. व्हिडिओत अक्षराने केसात गजरा, नाकात नथ, हातात बांगड्या, लाल रंगाची नऊवारी घातली आहे.
त्यामुळे तिचे सौंदर्य आणखीन खुलून आले आहे. चंद्रा गाण्यावरील एकही ठेका अक्षराने व्हिडिओत चुकवलेला नाही. यामुळे यातून तिची नृत्याची आवड आणि मराठी गाण्याविषयीचे प्रेम दिसून येत आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत, “काहीतरी नवीन आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला आवडेल. तुम्ही मला प्रेम, प्रोत्साहन दिलंत तर आणखी नवीन काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करेन.” असे म्हणले आहे.
सध्या हा व्हिडिओ पाहून नेटकरी अक्षराचे कौतुक करत आहेत. तिने केलेल्या या लावणीला सर्वांनीच दाद दिली आहे. मोठ्या प्रमाणात अक्षराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका भोजपुरी अभिनेत्रीला मराठी गाण्यावर नाचताना पाहून सर्वजण चकित झाले आहेत. अनेकांनी तिला इतर मराठी गाण्यावर लावणी सादर करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान अक्षरा सिंह एक सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आहे. तिने यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र पहिल्यांदाच तिने मराठी गाण्यावर लावणी सादर केली आहे. त्यामुळे सर्वांनाच तिचे कौतुक वाटत आहे. चंद्रा गाण्यावर अक्षराने धरलेला ठेका, तिचे सौंदर्य पाहून चाहते पूर्णपणे घायाळ झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अजामीनपात्र गुन्हा असल्याने तुरूंगात जावे लागणार
मनसेच्या १५,००० कार्यकर्त्यांना नोटीस; मुंबई सोडण्याचे आदेश, तेढ निर्माण करणारांवर कठोर कारवाईचा इशारा
“स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने राज ठाकरेंचा थयथयाट”
राहूल गांधींचा नाईट क्लबमध्ये ड्रिंक्स घेतानाचा व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते म्हणतात ते चीनच्या एजंटांसोबत…