bhausaheb shinde allegation on bhagatsing koshyari | दीपाली सय्यद या त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहे. शिवसेना नेत्या असलेल्या दीपाली सय्यद आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. आता त्यांच्या माजी सहकाऱ्याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
दीपाली सय्यद यांचे स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधला होता. त्याठिकाणी बोलताना त्यांनी दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दीपाली सय्यद यांनी अनेकांना बोगस लग्नाचा गंडा घालून कोट्यवधी रुपये लुटले आहेत, असा आरोप भाऊसाहेब शिदेंनी केला आहे.
दीपाली सय्यद यांनी लग्न झालेल्या जोडप्यांचे पुन्हा एकदा लग्न लावले आणि लोकांना सामूयादिक विवाह दाखवला. या माध्यामातून त्यांनी कोट्यवधी रुपये लुटले आहे, असा खळबळजनक आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर केला आहे.
दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचे वाटप केले. पण ऑडिट रिपोर्ट जेव्हा माझ्या हातात आली, तेव्हा ट्रस्टच्या खात्यात९१८२ रुपये असल्याचे समोर आले. त्यामुळे बाकीची रक्कम दीपाली सय्यद यांनी कुठून आणली याची चौकशी गुन्हे आर्थिक शाखेने करावी, असे भाऊसाहेब शिंदे यांनी म्हटले आहे.
दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचेही शिंदेंनी म्हटले आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांच्यात साटेलोटे असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. ९ सप्टेंबर २०२१ रोजी भगतसिंग कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली. ते लग्न झालेल्या जोडप्यांचे पुन्हा लग्न लावायचे, असे शिंदेंनी म्हटले आहे.
तसेच भाऊसाहेब शिंदे यांनी यावेळी राज्य सरकारला इशाराही दिला आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आठ दिवसांत तर चॅरिटेबल ट्रस्टची चौकशी झाली नाही, तर मी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आत्मदहन करेल, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट खेळत असताना दहावीच्या विद्यार्थ्याला आला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जाण्याआधीच मृत्यू
राखीच्या प्रियकराने रस्त्यावरच केली तिची धुलाई, ढसाढसा रडणाऱ्या राखीची झाली भयानक अवस्था; पाहा व्हिडिओ
जो दगड सोन्याचा समजून वर्षानुवर्षे जपून ठेवला, तो निघाला त्यापेक्षा अधिक मौल्यवान आणि दुर्मिळ