Share

shivsena : “शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट”; ठाकरेंवर टीका करत बड्या नेत्याने ठोकला पक्षाला रामराम

udhav thackeray

shivsena : ठाकरे गटातून एकच खळबळजनक बातमी समोर येतं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना थेट धक्का पोहचवणारी मोठी बातमी आता समोर आली आहे. सोलापूरत ठाकरे गटात भलं मोठं खिंडार पडले आहे. यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली असून पक्षात अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ठाकरे गटाला गळती लागल्याच चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. शिवसेनेतील दोन गट एकमेकांच्या विरोधात सध्या उभे आहेत. यामुळे राज्यातील राजकारण सध्या ढवळून निघालं आहे.

अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील अनेक वर्षांपासून शिवसेनेमार्फत जनतेची सेवा करणारे निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

आंधळकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर, आंधळकर यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ‘सध्याच्या घडीला शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट अशी परिस्थिती झाली असल्याच आंधळकर यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, पुढे बोलताना आंधळकर यांनी म्हंटलं आहे की, ‘कोरोना काळात दहा ते पंधरा लाख लोकांना शिवसेनेमार्फत जेवण खाऊ घातले तरी पक्ष प्रमुखांनी साधी दखल घेतली नाही. नाव घेऊन कौतुक करत नाहीत. यासाठीच शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याचे आंधळकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now