मधल्या काळात तर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अख्ख ठाकरे सरकार कोसळलं. अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यात काही असेही नेते आहेत की, त्यांनी सत्ता गेली तरी उद्धव ठाकरेंचा हात सोडलेला नाहीये.
याच यादीत नाव येते ते भास्कर जाधव यांचे..! मधल्या काळात अनेकांनी सत्तेसाठी उद्धव ठाकरेंची साथ सोडली मात्र भास्कर जाधव हे अजूनही खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या मागे उभे आहेत. नुकत्याच झालेल्या विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही भास्कर जाधव यांचा आक्रमकपणा पाहायला मिळाला.
यामुळे चित्र अधिकच स्पष्ट आणि सकारात्मक झाले की, भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खमकेपणाने उभे आहेत. मात्र असं असतानाच एक वेगळी आणि शिवसेनेच्या गोटात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भास्कर जाधव यांनी काल भाजपचे बडे नेते आणि राज्याचे सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या गाडीतून प्रवास केला.
विशेष बाब म्हणजे, शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. अशातच भास्कर जाधव यांनी चव्हाण यांच्या गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. मात्र आता रविंद्र चव्हाण आणि भास्कर जाधव यांच्या भेटीमागील सत्य समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी चव्हाण यांच्या स्वागताकरता भास्कर जाधव परशुराम घाटात हजर होते. चव्हाण यांच्या स्वागतानंतर जाधव हे परशूराम बस स्टॉप ते गेस्ट हाऊस एकाच गाडीने प्रवास करत गेले. दरम्यान, राजकीय वातावरण तापलेले असतानाच जाधव हे चव्हाण यांच्या गाडीतून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या.
महत्त्वाच्या बातम्या
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…