ramdas kadam : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होताच अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाला समर्थन दिले. यात शिवसेना नेत्या रामदास कदम यांचा देखील समावेश आहे. रामदास कदम यांनी देखील शिंदे गटाला समर्थन दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जबर धक्का बसला आहे.
त्यानंतर आता शिवसेनेतील दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. अशातच शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे आता शिवसेनेतील वातावरण आणखीच तापलं आहे.
वाचा नेमकं शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी काय म्हंटलंय?
शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल रत्नागिरीत मेळावा घेतला. त्याच वेळी बोलताना भास्कर जाधवांनी रामदास कदम यांना धारेवर धरले. जाधव म्हणाले, ‘मी राष्ट्रवादीत पालकमंत्री असताना माझे पाय धरलेत आणि मी राष्ट्रवादीत येतोय मला विरोध करू नको, असे रामदास कदम यांनी सांगितले.’
मात्र आता शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेल्याचे आवडले नाही, असे रामदास कदम सांगत असल्याचं जाधव यांनी सांगितलं. पुढे बोलताना जाधव यांनी कदम यांना थेट आव्हान देताना म्हंटलं आहे की, ‘कदमसाहेब शेळपटा सारखी उत्तरे देऊ नका, हिंम्मत असेल तर पोरग्याला आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगा. हिम्मत असेल तर निवडून येऊन दाखवा.’
दरम्यान, पुढे बोलताना जाधव यांनी एक आठवण सांगितली आहे. मी शिवसेना सोडली तेव्हा चिपळूण-खेर्डीमध्ये भास्कर जाधव ‘आईवर’ उलटला अशी टीका रामदास कदम यांनी केली होती. तर आता तू पोरग्याला घेऊन ‘आईवर’ उलटलास, अशा जहरी शब्दात जाधव यांनी कदम यांना लक्ष केले.
काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. अन् शिंदे गटात सामील झाले. उद्धव ठाकरेंची साथ सोडताना कदम यांना अश्रु देखील अनावर झाले होते. तेव्हापासून कदम हे शिवसेनेच्या निशाण्यावर आले आहेत. नुकतच भास्कर जाधव यांनी कदम यांना लक्ष केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील
Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार?
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार
amruta fadnavis : “ठाकरे सरकारमुळेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही”: अमृता फडणवीस