Bhaskar jadhav criticize governer | महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची वागणूक यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीका केली जाते. महाविकास आघाडीतील नेतेही बऱ्याचदा कोश्यारींना धारेवर धरताना दिसून येत असतात. आता शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
राज्यपालांवर टीका करताना भास्कर जाधवांची जीभ घसरली आहे. राज्यपाल म्हणजे घरगडी आहे, असे म्हणत त्यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. त्यांनी राज्यपालांवर खालच्या भाषेत टीका केल्यामुळे ते सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी माणसाविषयी केलेल्या वक्तव्यावरुन लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतांना अटक झाली आहे. देशात सध्या भाजपकडून दडपशाही सुरु आहे, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली आहे. चिपळूनमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहिलं होतं. पाच ऑगस्टपर्यंत त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. तसेच अधिवेशन संपल्यानंतर सात ऑगस्ट रोजी आपण हजर राहू असेही त्यांनी म्हटले होते. पण राऊतांच्या पत्राला कोणतंही उत्तर न देता, लोकसभेचं अधिवेशन सुरु असतानाच ईडीने त्यांच्यावर कारवाई केली, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार? असा प्रश्नही भास्कर जाधव यांनी यावेळी उपस्थित केली आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरज नाही. आता लोकांना लोकशाही काय आहे, हे समजले, असे म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला आहे.
शिवसेनेची यापुढील लढाई ही खुल्या मैदानात होईल. एकाने दुसऱ्याला गिळावे आणि दुसऱ्याने तिसऱ्याला गिळावे. हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा, तू जपून टाक पाऊल जरा, तू जपून टाक पाऊल जरा, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Malaika Arora: पॅन्ट न घालताच मलायका पोहोचली होती पार्टीत, लोकांनी रागात पाहिल्यानंतर.., वाचा किस्सा
Imtiyaz Jaleel: शहरातील लोकं औरंगजेबाला फाॅलो करत नाहीत, पण…; नामांतराबाबत जलीलांचे मोठे वक्तव्य
दीपक केसरकरांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदेंच्या आजारपणामागंच खरं कारण; म्हणाले..