Share

रात्रभर त्रास सहन करत राहिली भारती सिंग, लेबर पेन होत असतानाही ‘या’ कारणामुळे केला व्हिडीओ शुट

भारती सिंगने (Bharti Singh) तिच्या प्रेग्नेंसीची ( Pregnancy) बातमी कधीही लपवून ठेवली नाही. आई होण्यापर्यंतचा प्रत्येक प्रवास तिने आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केला. तिचा प्रवास पाहून अनेक महिलांना तिच्यापासून प्रेरणा मिळू शकते. अनेक स्त्रिया गरोदर राहिल्यानंतर काम सोडून काहीतरी अघटित घडेल या भीतीने घरी बसतात, तर भारती सिंग बाळाच्या जन्माच्या एक दिवस आधीपर्यंत शूटिंग करत राहिली. एवढेच नाही तर तिला त्यावेळी प्रसूती वेदना होत होत्या.(Bharti Singh was suffering from labor pains all night long)

अभिनेत्रीने तिच्या यूट्यूब चॅनलवर आई होण्यापूर्वीचा एक दिवसाचा प्रवास शेअर केला आहे. बाळाच्या आगमनाच्या एक दिवस आधी ती म्हणाली, मित्रांनो, आज माझी पाठ दुखत आहे. मला माहित नाही की ह्या प्रसूती वेदना आहे की आणखी काही. पण मी ते सहन करू शकते. मी माझ्या आईला आणि सासूबाईंनाही सांगितले नाही, त्या विनाकारण नाराज होतील.  त्यानंतर ती शूटिंगला जाते.

भारती म्हणते की, शूट करताना मी सगळं विसरून जाते. 15 वर्षे काम करायची सवय आहे ना? बघू, मी जेवढं करू शकतं तेवढं करेन, जास्त त्रास झाला तर हर्ष मला घरी पाठवून देईल. दुसऱ्या दिवशी भारतीला प्रसूती वेदना सुरू होतात. ती सांगते की मला भीती वाटत आहे, मला काय होईल हे माहित नाही. डॉक्टरांनी आम्हाला बोलावले आहे. सध्या तरी मी वेदना सहन करू शकते. त्यानंतर दोघेही कारमध्ये बसलेले दिसतात.

भारती पुढे म्हणते की, मी मुलगा आणि मुलगी दोघांचेही कपडे ठेवले आहेत. हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे शूट आहे. मला खूप भीती वाटत आहे तरीही हे क्षण मी चाह्त्यांसोबत शेअर करणार आहे. यानंतर भारती गाडीमधून हॉस्पिटलमध्ये पोहोचते. इथेही ती ब्लॉगिंग करत राहते. लेबर पेन सुरु असतानाही व्हिडिओ शूट करत होती भारती सिंग, यामागचे कारण म्हणजे तिच्या या प्रवासात अनेक चाहते सुरुवातीपासून तिला हिम्मत देत होते.

एक वेळ अशी येते की, तेव्हा भारती रडताना दिसते आणि म्हणते की सुई लावणार नाही ना? ज्याला नर्स नाही असे उत्तर देते. यानंतर भारती रात्री चार वाजता अंधारात बोलताना दिसत आहे. त्यावेळी ती म्हणते मित्रानो, आता पेन जास्त होत आहे. यानंतर तिने आपल्या राजकुमाराला जन्म दिला. हर्ष प्रत्येक क्षणी भारतीसोबत उभा दिसत होता.

हर्षने ही गोड बातमी आपल्या इंस्टाग्राम अकाउटवरून शेअर केली आहे. भारती आणि हर्षच्या चाहत्यांनी दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता भारती तिच्या लाडक्या मुलाची पहिली झलक कधी दाखवणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: करण जोहरने भारती-हर्षच्या मुलाला लॉन्च करण्यास दिला नकार, मग सलमानने घेतला पुढाकार
गुड न्यूज! भारती सिंहच्या घरी चिमुकल्याचे आगमन; सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत म्हणाली..
PHOTO: कॉमेडियन भारती सिंहने केले मॅटर्निटी फोटोशुट, गुलाब गाऊनमध्ये दिसत होती खुपच सुंदर

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now