कॉमेडियन भारती सिंह सध्या तिची प्रेग्नेंन्सीचा काळ एन्जॉय करत आहे. लवकरच ती एका बाळाला जन्म देणार आहे. गरोदरपणातही भारती खूप काम करत असून ती तिचा पती हर्ष लिंबाचियासोबत (Bharti Singh And Haarsh Limbachiyaa) ‘हुनरबाज’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. यादरम्यान भारतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हर्षने असं काही बोलला जे ऐकून भारतीच्या डोळ्यातून अश्रूच वाहू लागले.
भारती आणि हर्षचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ हा जुना असून तो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोदरम्यानचा आहे. या शोमध्ये भारती आणि हर्ष सूत्रसंचालक तर टेरेंस लुईस, गीता कपूर आणि नोरा फतेही परिक्षकाच्या भूमिकेत होते. शोदरम्यान हर्ष पत्नी भारतीचे कौतुक करतो. आणि पतीद्वारे कौतुक ऐकून भारतीला अश्रू अनावर होतात आणि ती शोमध्येच रडायला सुरुवात करते.
व्हिडिओत हर्ष म्हणताना दिसत आहे की, ‘भारती माझ्या आयुष्यातील पहिली, शेवटची आणि एकमेव अशी मुलगी आहे जी माझी प्रेयसी आहे. आम्ही अनेक वर्षे मित्र होतो आणि चांगले मित्र राहिलो. पण काही वर्षांनी मला जाणवलं की, तिच्यात पत्नी म्हणून ते सर्व गुण आहेत जे आजच्या काळात कोणामध्ये सापडले नसते’.
हर्ष पुढे म्हणतो, ‘कामासोबतच ती घराचीही खूप काळजी घेते. आणि ती माझ्यासारख्या व्यक्तीची काळजी घेते. त्यामुळे माझ्या A,B, C, D पासून ते Z पर्यंत सर्व काही भारतीच्या अवतीभोवती राहतात. पतीच्या तोंडून कौतुकाचे हे शब्द ऐकून भारती खूपच भावूक होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
व्हिडिओच्या शेवटी भारती हर्षला म्हणते की, ‘Z च्या आधी क, ख, ग, घ सुद्धा माझ्या पुढे राहतात’. यानंतर दोघे एकमेकांना मिठी मारतात. हर्ष आणि भारतीचा हा भावूक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच अनेक नेटकरी आणि भारती-हर्षचे चाहते या व्हिडिओला पसंती देत त्यावर अनेक कमेंट करत आहेत.
दरम्यान, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाने २०१७ साली लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्यांनी २०२० मध्ये एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, ते त्यांच्या पहिल्या बाळाची योजना करत आहेत. पण कोरोना महामारीमुळे त्यांनी हा निर्णय बदलला. तर आता लवकरच त्या दोघांच्या घरी पाळणा हलणार असून दोघे आई-बाबा बनणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहूद्या, त्याची स्मशानभूमी करू नका – प्रकाश आंबेडकर
…आणि फक्त ८ दिवसांतच मंगेशकरांना काढून टाकलं; तो किस्सा सांगत मोदींनी दाखवला काँग्रेसला आरसा
लतादीदींच्या वडिलांच्या पिंडाला शिवत नव्हता कावळा, तेव्हा लतादीदींनी ‘ही’ प्रतिज्ञा घेतली अन् कावळा शिवला