याचाच धागा पकडत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे. नव्या आघाडीच्या शुभेच्छा पण अजुन MIM बाकी असल्याचा खोचक टोला गोगावले यांनी लगावला आहे. बुडत्याला काडीचा आधार असल्याचे देखील गोगवले यांनी म्हंटलं आहे.
याचबरोबर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ’50 खोके एकदम OK’ या घोषणेवरुन तर मोठा गदारोळ माजला. सत्ताधारी आणि विरोधक तर थेट आमने सामने आले. 50 खोके एकदम OK या घोषणाबाजीने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपच्या आमदारांनाही हैराण करुन टाकले.
याबाबत बोलताना गोगावले यांनी म्हंटलं आहे की, खोके, बोके काय असतात आणि आम्हाला गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांना आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमचा हिसका अधिवेशन सुरु होण्या अगोदर दाखवला आहे. आमचा नाद कुणी करायचं नाय, असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला आहे.
इंदापूर येथे शिवसेना शिंदे गटाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना गोगावले यांनी विरोधकांना धारेवर धरले. गोगावले म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनी अशी काही जादूची कांडी फिरवली होती की त्याकडे उद्धव ठाकरे आमच्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हते.’
दरम्यान, ‘या कारणामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्यावर आम्ही सारी मंडळींनी त्यांना साथ दिली. आम्ही त्यांना सांगत होतो आपण भाजप बरोबर जाऊ पण राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सोडा याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलेच नाही, असा खुलासा गोगावले यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
Jharkhand : आता झारखंडमध्येही काय झाडी काय डोंगर! मुख्यमंत्र्यांसह ३६ आमदार झाले नॉट रीचेबल
Shivsena : झंडूबाम घेऊन ठेवा कारण तुमची.., शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा
शिवसेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला; ‘या’ मंत्र्याच्या दाव्याने मोठी खळबळ
रात्रीच्या बैठका घेतात, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, संभाजीराजेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक