Share

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ मालिकेतून मीनाक्षी राठोडने घेतला ब्रेक; आता ‘ही’ अभिनेत्री दिसणार देवकीच्या भूमिकेत

Sukh Mhanje Nakki Kay Asta

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार त्यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असतात. तर मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड.

मालिकेत मीनाक्षी आपल्या विनोदी अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येते. तिच्या या भूमिकेला चाहत्यांकडून खूप पसंती दिली जाते. पण आता मीनाक्षीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मीनाक्षी काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेणार असून तिच्या जागी दुसरी अभिनेत्री देवकीची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मीनाक्षी राठोड सध्या प्रेग्नेन्ट आहे. मागील काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेग्नेन्सीची बातमी समोर येताच लवकरच ती मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण मीनाक्षी मालिकेतून निघून गेल्यास मालिका पाहावीशी वाटणार नाही, असेही मत चाहत्यांनी मांडले होते. पण होणाऱ्या बाळासाठी आणि स्वतःच्या तब्येतीसाठी मीनाक्षीने मालिका सोडल्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवाय मीनाक्षी काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, जर मीनाक्षी मालिका सोडल्यास तिच्या जागी देवकीची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार असाही प्रश्न उपस्थित करण्यात येणार होता. तर आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.

बातम्यांनुसार, देवकीची भूमिका आता ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील मॅडी अर्थात अभिनेत्री भक्ती रत्नपारखी साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठी सीरीअल्स ऑफिशिअल नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ मालिकेच्या सेटवरचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भक्ती अभिनेत्री माधवी निमकरसोबत दिसून येत आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात आले की, ‘अभिनेत्री मीनाक्षी राठोडने घेतला आहे सुख म्हणजे नक्की काय असतं? मालिकेतून ब्रेक. आता अग्गंबाई सासूबाई फेम अभिनेत्री भक्ती रत्नपारखी साकारणार देवकीची भूमिका’.

भक्तीने मराठी आणि हिंदी मालिकांसोबत अनेक चित्रपटातही काम केले आहे. ‘उंबरठा’, ‘देऊळ’, ‘ओह माय गॉड’ अशा चित्रपटात ती दिसली होती. ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतील तिची मॅडी ही भूमिका फारच गाजली होती. या मालिकेतील आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. तर आता देवकीच्या पात्राला ती कितपत न्याय देणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
ढसाढसा रडत पायल रोहतगीने लॉकअपमध्ये सांगितले जीवनातील वाईट सत्य, म्हणाली, मी कधीच..
निवडून आल्यानंतर बॉलिवूडने केले नाही शत्रुघ्न सिन्हांचे अभिनंदन, म्हणाले, सगळ्यांना भिती आहे की..
संस्कृत आपली राष्ट्रीय भाषा असली पाहिजे कारण.., हिंदी भाषेच्या वादात आता कंगनाची उडी

मनोरंजन ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now