Share

बाकीचे १० जण काय लस्सी प्यायला गेले होते का? विजयाचे श्रेय धोनीला दिल्याने भज्जी संतापला

भारताने आतापर्यंत दोनदा विश्वचषक जिंकला आहे. 1983 मध्ये पहिल्यांदा आणि 2011 मध्ये दुसऱ्यांदा. पहिला विश्वचषक विजयाचे श्रेय महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी जोडला जातो आणि दुसऱ्या विजयाचे श्रेय त्या संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीला दिले जाते. आता अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने धोनीला श्रेय दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.(Bhajji got angry after giving credit for the victory to Dhoni)

2011 च्या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर, त्या संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू युवराज सिंगची कामगिरी खूपच प्रभावी होती. संघाला अंतिम फेरीत नेण्यात त्याची भूमिका सर्वात जास्त होती. त्याचबरोबर अंतिम सामन्यातही गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांची कामगिरी उत्कृष्ट होती. विजयात त्याचा मोठा वाटा होता. पण, हरभजनसिंगने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यावर विजयाची गाठ बांधल्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या हरभजनने धोनीला श्रेय दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

हरभजन सिंगने धोनीला विश्वचषक विजयाचे श्रेय दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ते स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले की, ऑस्ट्रेलियाने जेव्हा विश्वचषक जिंकला, त्यावेळी प्रत्येकजण म्हणतो की त्या देशाने विश्वचषक जिंकला. 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा लोक म्हणाले, एमएस धोनीने विश्वचषक जिंकला. असे असेल तर उर्वरित 10 खेळाडू तेथे लस्सी प्यायला गेले होते का? गौतम गंभीरने काय केले? इतरांनी काय केले? क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याचे सांगताना हरभजन म्हणाला की, जेव्हा सात-आठ खेळाडू चांगली कामगिरी करतील तेव्हा तुमचा संघ पुढे जाईल.

भारताने 2011 मध्ये 28 वर्षांनी आयसीसी विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यात धोनीने 91 धावा केल्या होत्या. सामन्याच्या शेवटी कुलसेकरच्या चेंडूवर विजयी षटकार मारून त्याने त्याला जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून स्थापित केले. मात्र, विजयाचे संपूर्ण श्रेय धोनीला दिल्याने गौतम गंभीरनेही नाराजी व्यक्त केली आहे. 2011 चा विश्वचषक संपूर्ण भारत, भारतीय संघ आणि सर्वांच्या पाठिंब्याने जिंकला होता, असे त्याने दोन वर्षांपूर्वी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या. या सामन्यात हरभजन सिंगने 10 षटकात 50 धावा देत 1 बळी घेतला. त्याचबरोबर युवराज सिंगने 10 षटकात 49 धावा देत 2 बळी घेतले. 275 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची पहिली विकेट 1 धावांवर पडली. वीरेंद्र सेहवाग खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताची दुसरी विकेट 31 धावांवर सचिन तेंडुलकरच्या रूपाने पडली. त्याने 18 धावा केल्या होत्या. तिसरी विकेट 114 धावांवर कोहलीच्या रूपाने पडली. या सामन्यात कोहलीने 35 धावा केल्या.

तिसरी विकेट पडल्यानंतर धोनी मैदानात आला आणि त्याने गौतम गंभीरसोबत 109 धावांची भागीदारी केली. गंभीरने 122 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 97 धावा केल्या. यानंतर धोनी आणि युवराजने 54 धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला. धोनीने 79 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 91 धावा केल्या. युवराज 21 धावांवर नाबाद राहिला.

महत्वाच्या बातम्या-
..जेव्हा भर मैदानात धोनीवर संतापले होते रवी शास्त्री, म्हणाले, खेळणं बंद कर; वाचा पुर्ण किस्सा
बायकोने धोका दिला, धोनीमुळे संघात मिळाली नाही जागा, तरीही हार न माननारा DK, वाचा प्रेरणादायी स्टोरी
IPL मध्ये डेब्यु करणारा खेळाडूच निघाला धोनीच्या वरचढ, रिव्ह्यू घेतला अन् धोनीला पाठवलं तंबूत; पहा व्हिडिओ
हे फक्त धोनीच करू शकतो! पहिल्याच सामन्यात केला आगळा वेगळा विक्रम, सचिन-द्रविडलाही टाकले मागे

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now