Share

अमिताभ बच्चनमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचे पतीसोबत झाले होते भांडण; पतीनेच केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीने नुकतीच तिच्या चाहत्यांसोबत एक हैराण करणारी गोष्ट शेअर केली आहे. भाग्यश्रीने सांगितले की, अमिताभ बच्चन यांच्यामुळे तिचे पतीसोबतचे नाते बिघडले होते. इतकंच नाही तर बिग बींमुळे भाग्यश्रीचा नवरा तिच्याशी अनेक दिवस बोलत नव्हता. (bhagyashree revealed about amitabh bachchan)

टीव्ही रिअॅलिटी शो स्मार्ट जोडीमध्ये भाग्यश्री पती हिमालयसोबत दिसून आली आहे. शोदरम्यान भाग्यश्रीने अनेक वर्षांपासून होळी मी होळी खेळत नव्हते, पण एका घटनेमुळे मी होळी खेळायला लागले. हाच किस्सा सांगताना अभिनेत्रीच्या पतीने सांगितले की, एकदा अमिताभ बच्चन यांच्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. पण आता सगळं काही ठीक आहे.

हिमालयने सांगितले की, होळीच्या दिवशी भाग्यश्री स्वतःला खोलीत कोंडून घ्यायची आणि मला होळी खेळायला सांगायची पण एके दिवशी तिला होळीच्या पार्टीसाठी अमिताभ बच्चन यांनी बोलावले. भाग्यश्री म्हणाली की, आपण बिग बींचे आमंत्रण कसे नाकारू शकतो, म्हणून ती अमिताभ बच्चन यांच्या होळी पार्टीला गेली.

भाग्यश्रीनेही पतीला या पार्टीत जाण्यासाठी राजी केले मात्र तो संतापला. तसेच जेव्हा ती बिग बींच्या पार्टीत गेली तेव्हा मागून अभिषेक आणि सैफ अली खान धावत आले आणि त्यांनी भाग्यश्रीला स्विमिंगपूलमध्ये ढकलून दिले. यानंतर तिचा पती हिमालय हा भाग्यश्रीशी आठवडाभर बोलला नाही. भाग्यश्रीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत होळी खेळली पण त्यांच्यासोबत नाही याचा राग हिमालयला आला होता.

हिमालय पुढे सांगतो की, तो भाग्यश्रीशी आठवडाभर बोलला नाही. नंतर त्याने पत्नीला माफ केले आणि पुढच्या वर्षी दोघांनी एकत्र होळी खेळली. यासोबतच हिमालयने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले कारण त्यांच्यामुळेच भाग्यश्री होळी खेळू लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हिमालय दसानीशी लग्न केले आणि आज ती २ मुलांची आई आहे. भाग्यश्रीने पळून जाऊन लग्न केल्याचे अनेकदा म्हटले जाते. याबद्दल बोलताना भाग्यश्री म्हणाली, माझ्या लग्नात माझ्या कुटुंबातील कोणी नव्हते आणि माझ्या पतीसोबतही कोणीच नव्हते. जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना सांगितले की मला त्याच्याशी लग्न करायचे आहे, तेव्हा ते सहमत नव्हते. त्यामुळे मी त्यांच्या मर्जीविरोधात लग्न केले.

तसेच भाग्यश्री पुढे म्हणते, पालकांची मुलांसाठी जशी स्वप्ने असतात, तशी मुलांचीही काही स्वप्ने असतात, मुलांनाही त्यांची स्वप्ने पुर्ण करण्याची संधी कधीतरी दिली पाहिजे. मी पळून जाऊन लग्न केले असे मीडिया आणि लोक म्हणतात तेव्हा मला राग येतो.

महत्वाच्या बातम्या-
आमीर खानच्या प्रेमात वेडी झाली ‘ही’ अभिनेत्री; इतक्या वर्षानंतर स्वत:च केला खुलासा
सावधान! आता whatsapp वर फेक न्युज पसरवणाऱ्यांवर होणार ‘ही’ कारवाई
पंतप्रधान मोदींना शिव्या देणाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी चाटायला लावली थुंकी, व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now