नवी दिल्ली। कोरोनाच्या महामारीमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे देशातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. शाळा, महाविद्यालयाचे कामकाज म्हणजेच ऑनलाइन लेक्चर, ऑनलाइन एक्झाम घेण्यात येत होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याने पुन्हा सर्व पूर्वीप्रमाणे होताना दिसत आहे.
लॉकडाऊन उठताच शाळा, महाविद्यालय सुरु झाले आहे. तसेच परीक्षा देखील आता ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. तसेच शाळा, महाविद्यालयातील अभ्यासक्रमात वेगवेगळे बदल देखील करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासंदर्भात आता गुजरात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
गुजरात सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. गुजरात विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वघानी यांनी यासंदर्भातली मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे गुजरातमधील शाळकरी विद्यार्थ्यांना आता भगवतगीतेचे धडे दिले जाणार आहेत.
मात्र, भगवतगीतेचे धडे विद्यार्थ्यांना कधी पासून दिले जाणार? कोणत्या वर्षांपासून नवीन अभ्यासक्रमात भगवतगीतेचा समावेश होणार? याबद्दल शिक्षण मंत्री जितू वघानी यांनी सविस्तर माहिती दिली. जितू वघानी यांनी सांगितले, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हा बदल करण्यात येणार आहे.
भगवतगीतेतील मूल्य आणि तत्व इयत्ता ६वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये शिकवले जातील. कारण आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि आपल्या ज्ञान व्यवस्थेविषयी विद्यार्थ्यांना माहिती असावे यासाठी हा बदल करण्यात आला आहे. तसेच ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेमधून व गोष्टीच्या स्वरूपात भगवतगीता शिकवण्यात येणार असल्याचे जितू वघानी यांनी सभागृहात स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
आई कुठे काय करते’फेम अरुंधतीने अनोख्या पद्धतीने साजरा केला मुलीचा वाढदिवस; चाहते म्हणाले, वाह…
बांग्लादेशमध्ये जमावाचा हिंदू मंदिरावर हल्ला, मौल्यवान वस्तूंची लूट करत केली तोडफोड
भयानक! नराधमांनी ओलांडल्या सर्व मर्यादा, मुलांसमोरच महिलेला निर्वस्त्र करुन केला सामूहिक बलात्कार
एकतेचे जिवंत उदाहरण! मुस्लीम व्यक्तीने हिंदू मित्रासाठी दान दिली स्वताची किडणी