नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 4 राज्यात सत्ता कायम राखली. मात्र पंजाब मध्ये ‘आप’ने सर्वच पक्षांना धक्का देत जोरदार मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे पंजाबमधील सत्तेची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
अशातच आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. आप सरकारने वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे सध्या सर्व स्तरातून मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. आप सरकार सत्तेत आल्यापासूनच धडाकेबाज निर्णयांची मालिका सुरू झालेली आहे.
त्यात मोफत वीज देण्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२२ पासून पंजाबमध्ये ३०० यूनिट वीज मोफत देण्यात येणार असून त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आप सरकारनं एका महिन्याच्या सरकारच्या कामाचं रिपोर्ट कार्ड वृत्तपत्रात जाहिराती देऊन प्रसिद्ध केलं.
तसेच आप सरकारनं या जाहिरातीद्वारेच मोफत वीज कधीपासून देण्यात येणार याची घोषणा केली आहे. मात्र, आतापर्यंत भगवंत मान यांच्या सरकारकडून यासंदर्भात कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. परंतु, आज पंजाबमधील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये मोफत वीज देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
दरम्यान, तर दुसरीकडे पंजाबमधील सत्तेची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीच्या संधी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी, माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा, असे निर्णय घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शालेय शिक्षणाबाबत दोन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतं आहे. काही दिवसांपूर्वीच खासगी शाळांच्या फी वाढीवर बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरे आक्रमक; ‘हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे की, तयारीत रहा; भोंगे न हटवल्यास..’
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेची शिवसेना-राष्ट्रवादीवर जहरी टीका
पवारांच्या घरावरील हल्ल्यात आमची काही चूक नाही, जे केलं ते सदावर्तेंनी केलं; आरोपींची कबुली
सदावर्तेंच्या वकिलीचा सनद होणार रद्द? मराठा सकल मोर्चाने दिला ‘हा’ इशारा, अडचणी वाढणार