bhagatsingh koshyari mumbai highcourt petition | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात अडकत असतात. नुकतीच त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. त्यामुळे ते वादात अडकले आहे.
राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी निषेध केला जात आहे. तर काही ठिकाणी त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहे. त्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडले आहे. अशात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे.
भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांना राज्यपाल पदावरुन हटवा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा अवमान केल्याचे याचिकेत म्हटले आहे.
दीपक दिलीप जगदेव असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. वकील नितीन सातपुते यांनीही याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल झाल्यानंतर आता लवकरच यावर सुनावणीसुद्धा होणार आहे. त्यामुळे सुनावणीत नक्की काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे,
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जनतेतील एकोपा आणि शांतता भंग केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६१ आणि १५६ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना भगतसिंग कोश्यारी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आहे. पण आताच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांपासून नितीन गडकरी हे आदर्श आहे, असे भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
Arun Gawali : मुलाच्या लग्नावेळी डाॅन अरूण गवळी झाला खूपच भावूक; म्हणाला, लग्न म्हणजे केवळ…
bhagatsingh koshyari : मोठी बातमी! भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन होणार हकालपट्टी?
Nagaraj Manjule: याला म्हणतात खरी मैत्री! बालपणीच्या मित्रासाठी नागराज मंजुळेंनी केलं असं काही की..वाचून कराल कौतूक