bhagatsingh koshyari case file in mumbai highcourt | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात अडकत असतात. नुकतीच त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. त्यामुळे ते वादात अडकले आहे.
राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी निषेध केला जात आहे. तर काही ठिकाणी त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहे. त्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडले आहे. अशात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे.
भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांना राज्यपाल पदावरुन हटवा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा अवमान केल्याचे याचिकेत म्हटले आहे.
दीपक दिलीप जगदेव असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. वकील नितीन सातपुते यांनीही याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल झाल्यानंतर आता लवकरच यावर सुनावणीसुद्धा होणार आहे. त्यामुळे सुनावणीत नक्की काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे,
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जनतेतील एकोपा आणि शांतता भंग केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६१ आणि १५६ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना भगतसिंग कोश्यारी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आहे. पण आताच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांपासून नितीन गडकरी हे आदर्श आहे, असे भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
Upendra dwivedi : इंडीयन आर्मी पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताच्या ताब्यात घेणार; जनरल द्विवेदी महत्वाची अपडेट देत म्हणाले आम्ही आता फक्त..
प्रेमासाठी तोडल्या धर्माच्या भिंती, हिंदू धर्म स्वीकारत मुस्लीम तरुणीने हिंदू तरुणासोबत घेतले सात फेरे
Dhananjay Powar: युट्यूब स्टार धनंजय पोवार एवढे फेमस कसे झाले? वाचा तुम्हाला खळखळून हसवणाऱ्या डिपी दादाबद्दल…