Share

मविआ असताना १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन भाजपचा दबाव होता? कोश्यारींनी केला मोठा गौप्यस्फोट

bhagat

महाविकास आघाडी सत्तेत असताना आणि भगतसिंग कोश्यारी राज्यपाल असताना त्यांच्यात अनेक वाद झाल्याचे दिसून आले. राज्यपालनियुक्त १२ आमदारांवरुन त्यांच्यावर अनेकदा टीका केली जायची. कारण त्यांनी त्या १२ आमदारांची नियुक्ती केली नव्हती.

आता भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपालपद सोडले आहे. त्यानंतर त्यांनी त्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोश्यारींवर केंद्राचा दबाव आहे. त्यामुळे ते सही करत नाही, अशी टीका त्यांच्यावर वारंवार होत होती. आता त्यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला १२ आमदारांच्या फाईलवर सही करण्यासाठी धमकी दिली होती. पुढच्या १५ दिवसांमध्ये फाईलवर सही करा असे निर्देश मला दिले गेले होते. जे राज्यपालांच्या गरिमेला शोभणारे नव्हते. मुख्यमंत्री पदावर बसलेला व्यक्ती असे निर्देश कसे देऊ शकतो? असे भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या आमदारांची नावे वारंवार बदलली जात होती. माझा कोणत्याच नावावर आक्षेप नव्हता. माझा आक्षेप पत्रात जी भाषा होती त्याावर होता. कोणताच मुख्यमंत्री राज्यपालांना यादीवर सही करा, असे निर्देश देऊ शकत नाही, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.

मी संविधानानुसारच काम केलं. राज्यपाल तुमचा नोकर नाही. मुख्यमंत्र्यांवर माझा संताप होत होता. सरकारने राज्यपालांची गरिमा न सांभाळल्यानेच मी  त्याच्यावर सही केली नाही. जर त्यांची भाषा नीट असते तर मी सही केली असते, असे भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे.

पहाटेच्या शपथविधीवरही कोश्यारींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनीच देवेंद्र फडणवीस यांना समर्थन असल्याचे म्हटले होते. पहाटे शपथ घेण्याची मागणीही त्यांनीच केली होती. सरकार बनवणारे आकडे सुद्धा त्यांच्याकडे होते. त्यामुळे मी त्यांना शपथ घेण्याची परवानगी दिली होती. त्यांनाही मी बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-
संजू सॅमसनसोबत केलं जातय राजकारण, ICC स्पर्धेपूर्वी रचला जात आहे कट; पुरावेच आले बाहेर
पृथ्वी शाॅची कारकिर्द धोक्यात; सपना गिल गंभीर आरोप करत म्हणाली, ‘त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टला…
‘हे’ आहेत पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू, दोन तर आहेत सख्खे भाऊ; जाणून घ्या त्यांचा व्यवसाय आणि संपत्ती

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now