bhagatsing koshyari again big statement | गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे चांगलेच चर्चेत आहे. ते काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा भगतसिंग कोश्यारी त्यांच्या वक्तव्यावरुन चर्चेत आले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुण्यात एक विधान केले आहे. त्या विधानावरुन राज्यपाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुणे दौऱ्यावर असताना ते एका कार्यक्रमात भाषणासाठी उभे राहिले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की मला वाटत नाही की मी राज्यपाल आहे.
कार्यक्रम सुरु असताना भगतसिंग कोश्यारी यांचे भाषण सुरु झाले होते. त्यावेळी एक महिला अचानक उभी राहिली. त्यांचे भाषण थांबवत ती म्हणाली की राज्यपालजी आम्हाला तुम्ही दिसत नाहीये. त्यावेळी राज्यपाल म्हणाले की, मला वाटतच नाही मी राज्यपाल आहे
भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, मैं मानता ही नहीं हुँ की मैं राज्यपाल हूँ, आप जैसा बोलेगी वैसा मैं करुँगा. राज्यपालांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकली होती. पण आता हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. राज्यपालांवर गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या टीकांना हे उत्तर असल्याचेही म्हटले जात आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. त्यामुळे त्यांची राज्यपाल पदावरुन हकालपट्टी करा अशी मागणी राज्यातील नेते करताना दिसून येत आहे. असे असतानाच मी राज्यपाल नाहीये, असे वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. राज्यपालांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्यामुळे राज्याचे वातावरण खुपच तापले आहे. तसेच अनेकांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
BJP : विधानसभेत तिसऱ्यांचा विजय, आप-काँग्रेसच्या उमेदवारांना धुळ चारणाऱ्या संगीता पाटील आहेत तरी कोण?
ruturaj gaikwad : आई-बाबांमुळे नाही, तर ‘या’ व्यक्तीमुळे.., ऋतुराजने ७ षटकारांच श्रेय दिलं ‘या’ खास व्यक्तीला; म्हणाला…
पत्नी आमदार होताच रविंद्र जडेजाही क्रिकेटमधून संन्यास घेऊन राजकारणात करणार प्रवेश; म्हणाला मी सुद्घा..