Share

‘भाभी जी घर पर है’ या प्रसिद्ध मालिकेतील कलाकारांचे शिक्षण किती झालेय माहितीये का? वाचून हैराण व्हाल

सध्या मनोरंजन क्षेत्रात अनेक चांगले बदल झाले आहेत. नेहमी चाहत्यांचे मनोरंजन होत आहे. अनेक कॉमेडी शो सध्या टीव्हीवर सुरू आहेत. अनेक शो सुपरहिट देखील ठरले आहेत. अनेक शो चाहत्यांच्या खूप जवळ आहेत. यातील अनेक शो मागील अनेक वर्षांपासून सुरू आहेत. तेच कलाकारांना विशेष शोमधील पात्रांच्या नावाने ओळखले जाते.

 

अनेक शोमधील अनेक प्रत्येक पात्र हे प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबद्दल जाणून घ्यायला खूप आवडते. प्रत्येक गोष्टींबाबत चाहते उत्सुक असतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या खाजगी आयुष्यापासून ते व्यवसायिक आयुष्यापर्यंत सर्व जाणून घ्यायला आवडते.

 

हे कलाकार आपले दैनंदिन जीवन कशा पद्धतीने जगतात हे देखील चाहत्यांना जाणून घ्याचे असते. म्हणूनच आज आपण या लेखात ‘भाभी जी घर पर है’या शोमधील कलाकारांच्या शिक्षणाबाबत जाणून घेणार आहोत. अँड टीव्हीवरील ‘भाभी जी घर पर है’ हा एक सुपरहिट शो आहे. मागील अनेक वर्षांपासून हा शो सुरू आहेत. या शोला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळत आहे.

 

प्रथमतः आपण या शोच्या विभूती नारायण उर्फ असिफ शेख बाबत जाणून घेणार आहोत. आपल्या माहितीच आहे की, विभूती नारायण हा अँगुरी भाभीच्या मागे असतो. या शोमधील त्याचे ही पात्र खूप प्रसिद्ध झाले आहे. असिफच्या शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आहे. सध्या तो एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक शोमध्ये काम केले आहे.

यानंतर रोहिताश गौडबद्दल जाणून घेऊन या. रोहिताश या शोमध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारत आहे. रोहिताशचे शिक्षण हरियाणामधून झाले आहे. त्याने इकॉनॉमिक्स या विषयातून पदवी घेतली आहे. त्याने अनेक शोमध्ये या अगोदर काम केले आहे.

त्यानंतर सर्वांची लाडकी भूमिका म्हणजेच या शोमधील भाभी जी. ही भूमिका अभिनेत्री शुभांगी अत्रे साकारत आहे. ही भूमिका चाहत्यांना खूप आवडते. त्याचबरोबर भाभी जीच्या निरागसतेमुळे आणि भोळेपणामुळे खूप भूमिका खूप प्रसिद्ध झाली आहे. शुभांगीचे शिक्षण मार्केटिंगमध्ये झाले असून एमबीए आणि एचआर पूर्ण केले आहे. तिने उच्च शिक्षण घेतले आहे.

त्यानंतर या शोमधील अनोखेलाल सक्ससेनाबद्दल जाणून घेवूया. अनोखेलाल सक्ससेना म्हणजे सानंद वर्मा होय. सानंदने या अगोदर अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. सानंदने आपले शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे. त्याने कॉम्प्युटर कोर्स देखील पूर्ण केला आहे.

यानंतर या शोमधून इन्स्पेक्टर हॅपी सिंहबद्दल जाणून घेऊया. हॅपी सिंह म्हणजेच योगेश त्रिपाठी. योगेश त्रिपाठी अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. याने अनेक पात्र साकारत प्रसिद्धी मिळवली आहे. योगेशचे शिक्षण गणितातून झाले आहे. त्यांनी बीएससी पदवीचा अभ्यास केला आहे.

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now