Share

प्रसिद्ध अभिनेत्री निघाली पाकीटमार, पुस्तक मेळाव्यात चोरी करताना पोलिसांनी केली अटक

Rupa Dutta

सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसेच अभिनेत्रीची झडती घेण्यात आली असता तिच्याजवळ अनेक पाकिटे आणि मोठी रक्कम आढळून आल्याची पोलिसांची माहिती आहे. रूपा दत्ता (Rupa Dutta) असे अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे.

रूपा दत्ता ही बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बंगालीमधील अनेक टीव्ही आणि चित्रपटांत काम केले आहे. रूपाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्यासंबंधित समोर येत असलेल्या माहितीनुसार, तिने ‘जय मां वैष्णो देवी’ या धार्मिक मालिकेत वेष्णो देवीची भूमिका साकारली आहे.

रूपाने वयाच्या १० व्या वर्षापासूनच काम करण्यास सुरुवात केली. तिला सामाजिक कार्यात रस आहे. तिने महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. तसेच ती एक दिग्दर्शिका, लेखिका आणि समाजसेविका असल्याचाही दावा तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या बायोमध्ये केला आहे.

रूपावर असा आरोप आहे की, ती कोलकाता येथील एका पुस्तक मेळाव्यादरम्यान चोरी करताना सापडली. या मेळावादरम्यान ती कचरा कुंडीत एक बॅग टाकून देताना एका पोलिस अधिकाऱ्याने तिला पाहिले. त्यानंतर पोलिसांना तिचा संशय येऊन तिची झडती घेतली असता तिच्याजवळ अनेक बॅग, पाकिटे आणि ७५ हजार रूपये रोख रक्कम आढळून आले.

दरम्यान, रूपा जत्रा किंवा इतर अनेक गर्दीच्या ठिकाणी जाऊन असे काम करत असल्याची चौकशीदरम्यान कबूली दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर रूपाने असे का केले? तसेच या गुन्ह्यात तिच्यासोबत आणखी कोण सामिल आहेत का? यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

अनुराग कश्यप यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप

यापूर्वीही रूपा २०२० साली चर्चेत आली होती. तिने बॉलिवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. अनुराग यांनी तिला फेसबुकवर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला होता. रूपाने तिच्या एका ट्विटमध्ये दोघांच्या संवादाचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. परंतु, नंतर समोर आले की, रूपा अनुराग नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीसोबत बोलत होती.

महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: ‘तु विद्या बालनसारखी दिसतेस’, अक्षय कुमारने श्रेया बुगडेला दिले खास गिफ्ट, श्रेयाही झाली अवाक
VIDEO: माझं प्रेम आहे अरुंधतीवर पण ती.., आशुतोषने इशाला सांगितले सर्व सत्य, अनिरुद्धचा जळफळाट
हास्यजत्रेच्या मंचावर येणार शेवंता, अपूर्वा नेमळेकर पहिल्यांदाचं कॉमेडी करताना दिसणार

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now