भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांची क्रिकेट कारकीर्द अप्रतिम होती. त्याने आपला ४१ वा वाढदिवस लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत साजरा करत आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली. धोनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाशीही बोलत नाही. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतही तो बहुतांशी माध्यमांपासून दूर राहिला आहे.(Mahendra Singh Dhoni, Cricket, Team India, Love Life)
मात्र धोनी त्याच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत येत असतो. साक्षीसोबत लग्नापूर्वी धोनीचे दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत अफेअर असल्याची चर्चा होती. याबाबत धोनी कधीच बोलला नाही पण राय लक्ष्मीने मीडियाला हे नक्की सांगितले. धोनीचा स्वभाव नेहमीच शांत राहिला आहे. मैदानावरही तो खूप मस्त राहतो. धोनीचे नाव अभिनेत्री राय लक्ष्मीसोबतही जोडले गेले होते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दोघांची प्रेमकहाणी खूप प्रसिद्ध होती. २००८च्या आयपीएल दरम्यान दोघांची भेट झाली होती. आयपीएलच्या या सीझननंतरच दोघांच्या लिंकअपची चर्चा रंगली होती. तथापि, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि लवकरच त्यांचे ब्रेकअप झाले. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात राय लक्ष्मी चेन्नई सुपर किंग्जची ब्रँड अॅम्बेसेडर बनली होती.
याचदरम्यान तिची धोनीशी भेट झाली. या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. या दोघांचे नाते का तुटले हे कोणालाच माहीत नाही. काही काळापूर्वी राय लक्ष्मीने धोनीसोबतचे नाते हे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले होते. त्या गोष्टीला आता बरीच वर्षे उलटून गेली आहेत आणि आता लोकांनी याबद्दल बोलणे बंद केले पाहिजे, असेही राय लक्ष्मी म्हणाली.
काही काळापूर्वी राय लक्ष्मी आणि धोनीबद्दल मीडियामध्ये काही अफवा पसरल्या होत्या. राय लक्ष्मी यांनी या गोष्टी थांबवण्यास सांगितले होते. राय लक्ष्मी हे तमिळ चित्रपटांमधील एक मोठे नाव असून ती काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही ती दिसली आहे. बरं आता ही गोष्ट खूप जुनी आहे. २०१० मध्ये महेंद्रसिंग धोनीने साक्षीशी लग्न केले. धोनीलाही एक लाडकी मुलगी आहे, जिचे नाव जीवा आहे.
महत्वाच्या बातम्या-
चाहत्यांना धक्का! महेंद्रसिंग धोनीवर गुन्हा दाखल, या एजन्सीच्या मालकाने केले गंभीर आरोप
रोहित शर्मा की महेंद्रसिंग धोनी? कमाईच्या बाबतीत खरा कॅप्टन कोण? आकडे वाचून डोळे फिरतील
महेंद्रसिंग धोनी नंबर ७ ची जर्सी का घालतो? स्वत:च सांगितली जर्सीमागची इनसाईड स्टोरी
चित्रपटापेक्षा वेगळी धोनीची खरी लव्ह स्टोरी, इथे झाली होती कॅप्टन कुल आणि साक्षीची पहिली भेट