Gulabrao Patil: आदित्य ठाकरे यांनी नुकतीच धरणगावात सभा घेतली. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आदित्य ठाकरेंनी धरणगावात घेतलेल्या सभेत बंडखोरांना गद्दार म्हणून हिणवले. त्यालाच प्रत्युत्तर देताना गुलाबराव म्हणाले की, गद्दार नसून आम्ही खुद्दार आहोत. पुढे बोलताना बंडादरम्यानच्या एका मोठ्या गोष्टीचा खुलासा त्यांनी केला आहे.
‘मी स्वतः २० आमदारांना घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. मात्र त्यांनी तेव्हा आमची दखल घेतली नाही,’ असं गुलाबराव पाटील म्हणाले. शिंदे गटात सामील होण्याआधी उद्धव ठाकरेंकडे २० आमदार घेऊन गेल्याचा मोठा खुलासा यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले, ‘शिंदे गटात जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याची दखल त्यांनी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. सर्वात आधी मी गेलेलो नाही. माझ्या अगोदर ३२ आमदार गेले होते. त्यानंतर मी शिंदे गटात सहभागी झालो.’
‘मात्र जेव्हा मी २० आमदार घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो. तेव्हा त्यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे शिवाजी महाराज करतात तसा तह केला असता तर ही वेळ आली नसती, या शब्दात गुलाबरावांनी बंडादरम्यानचा त्यांचा अनुभव सांगितला.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे तरुण आहेत. आता करतात त्याप्रमाणे महाराष्ट्रभर दौरे त्यांनी तेव्हा करायला पाहिजे होते, अशी आमची अपेक्षा होती. मात्र तसं त्यांनी केलं नाही. आदित्य ठाकरेंनी सभेमध्ये शिंदे गटावर गद्दारीचा जो आरोप केला. त्याचाही समाचार पाटलांनी घेतला.
ते म्हणाले की, ज्या एकनाथ खडसेंमुळे भाजप शिवसेना युती तुटली होती. त्याच खडसेंसोबत तुम्ही आज बसलात. आणि आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलो तर आम्हाला तुम्ही गद्दार गद्दार कसं म्हणता? “आम्ही गद्दार नाहीतर खुद्दार आहोत,” असेच गुलाबरावांनी यावेळी आदित्य ठाकरेंना ठणकावून सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
Aditya Thackeray : जळगावातल्या सभेत आदित्य ठाकरेंनी फासा टाकला; शिंदे समर्थक या आमदाराच्या बहिणीला देणार तिकीट?
गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंच जंगी स्वागत; इमारतींच्या छतावरही गर्दीच गर्दी!
‘बॉयकॉटमुळे फक्त आमिरचे नुकसान होत नसून, हजारो कुटुंबाचं नुकसान होतं’- विजय देवरकोंडा