Share

अंपायरशी भांडण्यापुर्वी आपआपसात भांडले होते दिल्लीचे खेळाडू, अखेर समोर आले ‘ते’ सत्य

IPL 2022 च्या 34 व्या RR VS DC सामन्याच्या शेवटच्या षटकात, दिल्ली कॅपिटल्स (DC) चा गोलंदाज शार्दुल ठाकूरने मिस फिल्ड झाल्यामुळे कुलदीप यादववर (KULDEEP YADAV) ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर कर्णधार ऋषभ पंतने आपली प्रतिक्रिया दिली. दिल्ली कॅपिटल्स (DC) हा सामना 15 धावांनी हरला.(before-the-quarrel-with-the-umpire-the-players-of-delhi-capitals-were-arguing-with-each-other)

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने (DC) नाणेफेक जिंकून 2 बाद 222 धावा केल्या. पुन्हा एकदा जोस बटलरने (JOS BATTLER) शतक केले. त्याने 65 चेंडूत 116 धावा केल्या. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्ससाठी (DC) शेवटच्या षटकाची गोलंदाजी करण्याची जबाबदारी शार्दुल ठाकूरकडे देण्यात आली होती.

20व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार संजू सॅमसनने शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर धारदार शॉट खेळला. हा चेंडू कुलदीप यादवच्या दिशेने गेला पण वेगवान असल्यामुळे तो मिस फिल्ड झाला आणि चौकार गेला. यानंतर शार्दुल ठाकूरने मैदानातच कुलदीप यादववर (KULDEEP YADAV) ओरडायला सुरुवात केली.

RR VS DC च्या 20व्या षटकातील 5व्या चेंडूनंतर शार्दुल ठाकूरने शेवटचा चेंडू टाकला. या चेंडूवर राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार संजू सॅमसनने शानदार शॉट खेळताना चेंडूवर षटकार ठोकला. यादरम्यान, विकेटच्या मागे कीपिंग करताना, दिल्ली कॅपिटल्सचा (DC) कर्णधार ऋषभ पंतने(Rishabh Pant) तीव्र प्रतिक्रिया दिली.

तो शार्दुलकडे टक लावून बराच वेळ पाहत राहिला. या षटकारामुळे राजस्थान रॉयल्सची (RR) धावसंख्या 222 धावांची झाली. आता या दोन्ही प्रकरणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने तर असे लिहिले आहे की, शार्दुल ठाकूर म्हणत आहे की मला चेन्नई सुपर किंग्जमध्ये जावे लागेल.

https://twitter.com/harshkhatwa/status/1517541655624048643?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517541655624048643%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsatyodayamedia.com%2Fcricket%2Fipl-2022-shardul-thakur-dc-vs-rr-pant%2F

https://twitter.com/dheerajs107/status/1517543428841631744?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517543428841631744%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsatyodayamedia.com%2Fcricket%2Fipl-2022-shardul-thakur-dc-vs-rr-pant%2F

https://twitter.com/monalisa_1418/status/1517539752152801282?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517539752152801282%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsatyodayamedia.com%2Fcricket%2Fipl-2022-shardul-thakur-dc-vs-rr-pant%2F

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now