सध्या सर्वत्र इंडियन प्रीमियर लीगची चर्चा सुरू झाले आहे. यंदाचा हा १५ वा हंगाम असणार आहे. येत्या दोन दिवसात आयपीएलच्या सामन्यांची सुरुवात होणार आहे. क्रिकेटप्रेमी आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या सामन्यांची सुरुवात मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. तसेच पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघात होणार आहेत.
कारण हे दोन संघ मागील हंगामातील अंतिम फेरीतील संघ होते. त्यामुळे यांच्यातील पहिला सामना शनिवारी (२६ मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मागील वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके संघाने विजेतेपद पटकावले होते. त्याबरोबर यावेळी केकेआर संघाचा श्रेयस अय्यर हा नवा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआर संघ त्या पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत आहे.
मात्र, प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या आनंदाला गालबोट लावण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याचे समजले. त्यामुळे सामन्यापूर्वी महाराष्ट्र एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, एटीएसने गुरुवारी (२४ मार्च) काही दहशतवाद्यांना पकडले, ज्यांनी चौकशीदरम्यान उघड केले की, “त्यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियम, खेळाडूंचे हॉटेल आणि दोन ठिकाणांना जोडणारा रस्ता तपासला होता.”
त्याचबरोबर दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन सध्या स्टेडियमभोवतीच्या सुरक्षेतमध्ये वाढ केली आहे. तसेच एटीएसने दहशतवाद्यांना आळा घातला आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, २६ मार्च ते २२ मे या कालावधीत क्यूआरटी, स्पेशल फोर्स आणि एसपीआरएफ संपूर्ण स्पर्धेत तैनात केले जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आणि खेळाडू हे सुरक्षित असतील.
तसेच यावेळी आयपीएलमध्ये एकूण ७० साखळी सामने होणार आहेत. त्याचबरोबर हे सर्व सामने मुंबई आणि पुण्यातील चार ठिकाणच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. यामध्ये मुंबईचे वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईचे डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम यांचा समावेश आहे.